CM Arvind Kejriwal : माझ्या अटकेने मला आश्चर्य वाटले नाही; केजरीवालांचा संदेश पत्नी सुनितांनी वाचून दाखवला | पुढारी

CM Arvind Kejriwal : माझ्या अटकेने मला आश्चर्य वाटले नाही; केजरीवालांचा संदेश पत्नी सुनितांनी वाचून दाखवला

पुढारी ऑनलाईन डेस्क :  बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना शुक्रवारी ६ दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज (दि. २३) पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तुरुंगातून पाठवलेला संदेश वाचून दाखवला आहे. CM Arvind Kejriwal

केजरीवाल यांचा संदेश वाचताना सुनीता म्हणाल्या की, “तुमचा मुलगा आणि भाऊ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून संदेश पाठवला आहे, यात त्यांनी म्हटले आहे की, ‘माझ्या प्रिय देशबांधवांनो मला अटक करण्यात आली आहे. मी तुरुंगात असलो किंवा नसलो तरी मी देशाची सेवा करत राहीन. माझे संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित आहे. मी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे आणि मला माहित आहे की हे असेच चालू राहणार आहे. त्यामुळे या अटकेने मला आश्चर्य वाटले नाही. मला अटक केल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. CM Arvind Kejriwal

ते पुढे म्हणाले की, मी आत असो वा बाहेर, मी प्रत्येक क्षणी देशाची सेवा करत राहीन. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित आहे, माझ्या शरीरातील प्रत्येक कण देशासाठी आहे. माझे या पृथ्वीवरील जीवन हे संघर्षासाठी आहे. म्हणूनच या अटकेने मला आश्चर्य वाटले नाही. मी माझ्या पूर्वीच्या जन्मात बरीच चांगली कामे केली असतील कारण माझा जन्म भारतासारख्या महान देशात झाला आहे. आपल्याला एकत्र भारताला पुन्हा एकदा महान बनवायचे आहे. देशाच्या आत आणि बाहेर अनेक शक्ती भारताला कमकुवत करत आहेत.

हेही वाचा

Back to top button