ISRO Pushpak (RLV-TD) | अंतराळयान प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानात इस्रोचे मोठे यश: ‘पुष्पक’ रॉकेटची चाचणी यशस्वी | पुढारी

ISRO Pushpak (RLV-TD) | अंतराळयान प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानात इस्रोचे मोठे यश: 'पुष्पक' रॉकेटची चाचणी यशस्वी

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुष्षक रॉकेटचे आज (दि.२२) यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रक्षेपण वाहनाच्या यशस्वी चाचणीनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अंतराळयान प्रक्षेपण वाहन पुर्नवापर तंत्रज्ञानामध्ये मोठे यश मिळवले आहे. आज (दि.२२) सकाळी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी श्रेणीत ‘पुष्पक’ रॉकेट म्हणजेत इस्रोचे रिलॉन्च व्हेईकल यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरवण्यात इस्रोला यश आले. या संदर्भातील माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (ISRO Pushpak (RLV-TD)

पुष्पक रॉकेटचे हे तिसरे उड्डाण होते. २०१६ मध्ये पुष्पक रॉकेटची पहिली चाचणी घेण्यात आली होती, जेव्हा ते बंगालच्या उपसागरात आभासी धावपट्टीवर उतरवण्यात आले होते. तथापि, ते पुन्हा पूर्णपणे बुडाले आणि पुन्हा सावरले नाही. दुसरी चाचणी २०२३ मध्ये झाली, जेव्हा ते लँडिंगसाठी चिनूक हेलिकॉप्टरमधून सोडले गेले. त्यानंतर आज तिसऱ्यांदा पुष्पकची चाचणी करण्यात आली. इस्रो या रॉकेटची सतत चाचणी करत आहे, जेणेकरून आव्हानात्मक परिस्थितीत त्याची क्षमता तपासता येईल. ISRO Pushpak (RLV-TD)

RLV ‘पुष्पक’ च्या पहिल्या दोन चाचण्याही यशस्वी

पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या पहिल्या दोन चाचण्याही यशस्वी झाल्या. इस्रोने यापूर्वी दोनदा RLV(पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन) यशस्वीरित्या उतरवले आहे. गेल्या वर्षी, इस्रोने रीयूजेबल लॉन्चिंग व्हीकल चाचणी दरम्यान, RLV हे वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून सुमारे साडेचार किलोमीटर उंचीवरून प्रक्षेपित केले होते. चाचणी दरम्यान, RLV धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरले. RLV ने ब्रेक पॅराशूट, लँडिंग गियर ब्रेक आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टमच्या मदतीने यशस्वी लँडिंग केले. पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या यशस्वी लँडिंगने नेव्हिगेशन, कंट्रोल सिस्टम, लँडिंग गियर आणि डिलेरेशन सिस्टम यासारख्या इस्रोने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या यशाची पुष्टी केली आहे.

अंतराळ मोहिमांचा खर्च कमी होणार : एस. सोमनाथ

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, भारतात पुष्पक प्रक्षेपण वाहन बनवणे हे भारताच्या अंतराळ मोहिमेला किफायतशीर बनवण्यासाठी एक मोठे आणि आव्हानात्मक पाऊल होते. प्रक्षेपण वाहनातच सर्वात महागडे इलेक्ट्रॉनिक्स भाग असतात. अशा परिस्थितीत, पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन बनून, हे वाहन मोहिमेच्या यशानंतर पृथ्वीवर परत सुरक्षितपणे उतरण्यास सक्षम असेल आणि पुढील मोहिमेत तेच प्रक्षेपण वाहन पुन्हा वापरता येईल. अंतराळातील कचरा कमी करण्याच्या दिशेने हेदेखील एक महत्त्वाचे पाऊल आहे. ISRO Pushpak (RLV-TD)

हेही वाचा:

Back to top button