Earthquake in Marathwada : पूर्णा तालूक्यात भुकंपाचा धक्का; भीतीने लोक घराबाहेर पळाले | पुढारी

Earthquake in Marathwada : पूर्णा तालूक्यात भुकंपाचा धक्का; भीतीने लोक घराबाहेर पळाले

पूर्णा : आनंद ढोणे
पूर्णा तालूका परिसरात सकाळी ६ वाजून ९ मिनीटांनी भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाची ४.२ रिश्टर स्केल तीव्रता नोंदवली आहे. सकाळी झोपेतून उठण्याच्या सुमारासच भुकंपाचा धक्का बसला. यात घरावरील टिनपत्रे हादरली गेल्याने भीतीने लोक घराबाहेर पळाले.

३० वर्षांपूर्वी लातूर जिल्हा किल्लारी येथील ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनीटांनी सुमारे ४० सेंकद ६.४ रिश्टर स्केलवरील तीव्र भुंकपाने हादरला होता. घरे पडून हजारो नागरीक ढिगाऱ्याखाली गाडले होते. त्याची पूनरावृत्ती गुरुवारच्या सौम्य धक्याने टळल्यामुळे नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, या भुकंपाच्या धक्याने भयभीत होत नागरीक मुला बाळांसह तातडीने घराबाहेर पडले होते. या भुकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पासून १५ किलोमिटर अंतरावर असल्याची माहिती मिळत आहे. काही ठिकाणी या भुकंपाचे दोन‌ धक्के जाणवले. अनेक ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेल्याचीही माहीती समोर येत आहे. भुगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होऊन त्याची परिणीती तीव्र सौम्य भुकंप लहरी तयार होवून पृथ्वीवरील पृष्ठभागाची हालचाल होते असे शास्रज्ञाकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button