धक्कादायक! परभणीत हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहीतेने जीवन संपवले | पुढारी

धक्कादायक! परभणीत हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहीतेने जीवन संपवले

पूर्णा; पुढारी वृत्तसेवा : तालूक्यातील सुहागन येथील एका नवविवाहीतेने हुंड्याच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेवून जीवन सपंवल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात मयत विवाहीत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पतीसह सासरच्या नऊ जणावर हुंडाबळी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील गंगाधर तुळशीराम वाघमारे याचे शेलवाडी (ता. लोहा जि. नांदेड) येथील ज्ञानोबा मुंजाजी नकूले यांची मुलगी दिव्या (वय २० वर्ष) हिच्या सोबत २७/११/२०२३ रोजी विवाह झाला होता. लग्नामध्ये गंगाधर तुळशीराम वाघमारे यास एकूण दिड लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. त्यापैकी मयत विवाहित मुलीचे वडील ज्ञानोबा नकूले यांनी लग्नाच्या खर्चामुळे एक लाख रुपये नगदी दिले होते. आणि उर्वरित पन्नास हजार रुपये नंतर देण्याचे ठरले होते. मात्र या पैशासाठी पती गंगाधर वाघमारे यांनी मयत विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. हुंड्यात राहीलेले पैसे मोटारसायकल पाहीजे अशी मागणी करत असल्याची माहिती मयत विवाहित महिलेने वडिलांना दिली होती असे तक्रारीत म्हटले आहे.

पती, सासू, सासरे, दिर हे सर्वजण मिळून हुंड्याबाबत विचारणा करुन मानसिक त्रास देतात व उपाशीपोटी ठेवून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देत असल्याची वडिलांकडे तक्रार केल्याचे देखील विविहितेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. आज सकाळी या मयत विवाहित मुलीने जीवन संपवल्याची माहिती वजिलांना मिळाला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

ही घटनास्थळी पूर्णेचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील, पोनी विलास गोबाडे, सपोनि दर्शन शिंदे, महिला सपोनि रेखा शहारे, चाऊस यांनी भेट देवून पाहणी करत पंचनामा केला. या घटनेतील सुहागन येथील पतीसह सासरच्या नऊ ते दहा आरोपीवर पूर्णा पोलिस ठाण्यात भादवी कलम ४९८ए,३०४ ब,३०६,३२३,५०४,५०६,३४,४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि रेखा शहारे करीत आहेत. दरम्यान, मयत मुलीच्या माहेरकडील नातेवाईक दिवसभर ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या मांडून होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर सायंकाळी ४:३० नंतर शवविच्छेदन केलेला दिव्याचा मृतदेहावर जड अंतःकरणाने शेलवाडीकडे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.

Back to top button