SSC Exam 2024 : दहावीचे पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने जीवन संपवले; गडहिंग्लज येथील घटना | पुढारी

SSC Exam 2024 : दहावीचे पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने जीवन संपवले; गडहिंग्लज येथील घटना

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : दहावीचे आतापर्यंत झालेले पेपर अवघड गेल्याने सत्यम लक्ष्मण कोळी (वय 16, रा. स्वामी कॉलनी, गडहिंग्लज, मूळ गाव हेब्बाळ कसबा नूल) या विद्यार्थ्याने घरातील फॅनला गळफास घेऊन जीवन संपवले. यासंदर्भातील फिर्याद अजित तळवार यांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली.

सत्यमचे वडील लक्ष्मण हे खासगी नोकरी करतात. त्यांचे मूळ गाव हेब्बाळ हे आहे. सध्या कोळी कुटुंब गडहिंग्लजमध्ये वास्तव्यास आहे. सत्यम हा गडहिंग्लजमधील खासगी शाळेत शिकत होता. दहावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर त्याला पेपर अवघड गेल्याचे तो घरच्यांना सांगत होता. याच ताणतणावातून त्याने सोमवारी (दि. 18) सकाळी 9 च्या सुमारास बेडरूममधील फॅनला गळफास घेतला. घरच्यांनी त्याला तातडीने उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Back to top button