वाशिम : विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू | पुढारी

वाशिम : विजेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : किन्हीराजा येथील वार्ड क्र.५ मधील मुबशीर शहा या २० वर्षीय तरूणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.१४) रात्री घडली. कुटुंबातील कर्ता व्यक्ती असणाऱ्या मुबशीरच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील २० वर्षीय युवक मुबशीर हा रोजंदारी कामगार असल्याने तो कामासाठी कवरदरी येथे गेला होता, त्या ठिकाणी मंदिराचे काम सुरू होते. मंदिरावर काम सुरू असताना मंदिराच्यावरून गेलेल्या विजेच्या तारेला त्याचा स्पर्श होऊन तो खाली कोसळला. त्याला तातडीने कवरदरी येथुन किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुबशीर शहा हा घरातील कर्ता व्यक्ती होता. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात मुबशीरचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

Back to top button