BCCI : कसोटी क्रिकेटला मिळणार ‘संजीवनी’; खेळाडूंच्या मानधनात घसघशीत वाढ | पुढारी

BCCI : कसोटी क्रिकेटला मिळणार 'संजीवनी'; खेळाडूंच्या मानधनात घसघशीत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-1 अशी जिंकली आहे. या विजयानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI)  मोठी घोषणा केली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी लगेचच एक पोस्ट करत ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना विद्यमान सामना शुल्कावर अतिरिक्त बक्षीस दिले जाणार आहे. 2022-23 हंगामासाठी होणारी ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ लागू करण्यात आली आहे. (BCCI)

BCCI सचिव जय शाह यांनी जाहीर केले, ‘मला भारतीय संघातील खेळाडूंसाठी ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ सुरू केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. याचा उद्देश आपल्या प्रतिष्ठित खेळाडूंना आर्थिक वाढ आणि स्थिरता प्रदान करणे आहे. 2022-23 हंगामापासून सुरू होणाऱ्या ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ कसोटी सामन्यांच्या विद्यमान सामना शुल्कावर अतिरिक्त बक्षीस संरचना म्हणून देण्यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले आहे.  (BCCI)

मॅच फी व्यतिरिक्त मिळणार आर्थिक प्रोत्साहन

‘बीसीसीआय’ने एका हंगामात सात किंवा अधिक कसोटी सामन्यांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी प्रति-सामना शुल्क सध्याच्या 15 लाख रुपयांवरून 45 लाख रुपये (खेळाडूंच्‍या वर्गवारी) केले आहे. 50 टक्के सामन्यांमध्ये प्लेइंग-11 चा भाग असलेल्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी एकूण 30 लाख रुपये मिळतील, तर तेवढ्याच सामन्यांमध्ये संघाचा भाग असलेल्या खेळाडूंना प्रति सामना 15 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर एखादा खेळाडू ५० टक्क्यांपेक्षा कमी सामने खेळला तर त्याला कोणतेही आर्थिक प्रोत्साहन मिळणार नाही. प्रत्येक सामन्यासाठी फक्त 15 लाख रुपये मॅच फी असेल.

हेही वाचा : 

Back to top button