Bengaluru Water Crisis : बेंगळुरूमध्ये पाणीटंचाई; मॉल्समधील टॉयलेट वापरण्याची नागरिकांवर वेळ | पुढारी

Bengaluru Water Crisis : बेंगळुरूमध्ये पाणीटंचाई; मॉल्समधील टॉयलेट वापरण्याची नागरिकांवर वेळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेंगळुरूमधील पाणी टंचाईचे संकट गंभीर बनू लागले आहे. परिणामी नागरिकांना मॉल्समधील शौचालये वापरावी लागत आहेत, असा दावा एका वापरकर्त्याने Reddit या प्लॅटफॉर्मावर एक पोस्ट शेअर करून केला आहे. कर्नाटकची राजधानी गंभीर जलसंकटाने ग्रासली आहे. बेंगळुरूमधील बोअरवेल ओस पडल्या आहेत. त्यामुळे हे संकट ओढवले आहे, नागरिक सोशल मीडियावर त्यांच्या व्यथा शेअर करत आहेत. Bengaluru Water Crisis

दरम्यान, सोशल मीडियावर फिरत असलेल्या Reddit पोस्टने बेंगळुरूमधील पाणी टंचाईवर प्रकाश टाकला आहे. बहुतेक भाडेकरूंनी घरे सोडून इतर तात्पुरत्या निवासस्थानी जाणे पसंत केले आहे. नागरिकांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यासाठी अनेकदा जास्त शुल्क मोजावे लागत आहे. Bengaluru Water Crisis

महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांवर लागलेल्या लांबच लांब रांगा आणि महागड्या पाण्याच्या टँकरवरची अवलंबित्व हे शहराच्या अनेक भागात नित्याचेच झाले आहे. पाण्याच्या उपलब्धतेच्या अनिश्चिततेमुळे रहिवाशांमध्ये चिंता वाढली आहे. तर नागरिकांना मूलभूत गरजांसाठी पुरेसे पाणी मिळवून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. दरम्यान, पाणी टंचाईवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कमेंटचा पूर आला आहे. बेंगळुरूच्या रहिवाशांनी निराशा, भीती आणि चिंता व्यक्त करणाऱ्या पोस्ट्सने सोशल मीडियावर महापूर आला आहे.

Bengaluru Water Crisis: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी टँकरने पाणीपुरवठा

भारताची आयटी सिटी म्हणून जगभर बोलबाला असलेल्या बंगळुरू शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या निवासस्थानी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या बंगल्यातील बोअरलाही पाणी बंद झाले आहे.

शहरात सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही टँकरे पाणी पुरवले जात असल्याचे CNBC18ने म्हटले आहे. बंगळुरूत तब्बल ३ हजार बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. तर बऱ्याच कंपन्या, खासगी संस्था अडचणीत सापडल्या आहेत.

बंगळुरूचे पाणी दोन मुख्य स्त्रोतांकडून मिळते: कावेरी नदी, जी दररोज 1,450 दशलक्ष लिटर (एमएलडी) पृष्ठभागावरील पाण्याचा पुरवठा करते आणि ब्रुहत बेंगलुरु महानगर पालीके (BBMP) द्वारे तयार केलेले बोअरवेल, जे अतिरिक्त 700 MLD पाणी पुरवते. बेंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळ (BWSSB) द्वारे वितरीत केले जाते. एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या कावेरी स्टेज  प्रकल्पातून शहराला अतिरिक्त 775 MLD मिळणे अपेक्षित होते. तथापि, कावेरी खोऱ्यात पावसाच्या तीव्र कमतरतेमुळे ही गणना विस्कळीत झाली असावी. BWSSB ने शहरातील पाण्याच्या इनपुटमध्ये 50% घट नोंदवली.

हेही वाचा 

Back to top button