Bengaluru Water Crisis : आयटी सिटी बंगळुरूत पाणीबाणी : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात टँकरने पाणीपुरवठा; जनजीवन कोलमोडले

Bengaluru Water Crisis : आयटी सिटी बंगळुरूत पाणीबाणी : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात टँकरने पाणीपुरवठा; जनजीवन कोलमोडले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची आयटी सिटी म्हणून जगभर बोलबाला असलेल्या बंगळुरू शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या निवासस्थानी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या बंगल्यातील बोअरलाही पाणी बंद झाले आहे.

शहरात सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही टँकरे पाणी पुरवले जात असल्याचे CNBC18ने म्हटले आहे. बंगळुरूत तब्बल ३ हजार बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. तर बऱ्याच कंपन्या, खासगी संस्था अडचणीत सापडल्या आहेत.

बंगळुरूचे पाणी दोन मुख्य स्त्रोतांकडून मिळते: कावेरी नदी, जी दररोज 1,450 दशलक्ष लिटर (एमएलडी) पृष्ठभागावरील पाण्याचा पुरवठा करते आणि ब्रुहत बेंगलुरु महानगर पालीके (BBMP) द्वारे तयार केलेले बोअरवेल, जे अतिरिक्त 700 MLD पाणी पुरवते. बेंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळ (BWSSB) द्वारे वितरीत केले जाते. एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या कावेरी स्टेज  प्रकल्पातून शहराला अतिरिक्त 775 MLD मिळणे अपेक्षित होते. तथापि, कावेरी खोऱ्यात पावसाच्या तीव्र कमतरतेमुळे ही गणना विस्कळीत झाली असावी. BWSSB ने शहरातील पाण्याच्या इनपुटमध्ये 50% घट नोंदवली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news