Devon Conway : ‘आयपीएल’च्या सुरूवातीलाच चेन्नईला मोठा धक्का; ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त | पुढारी

Devon Conway : 'आयपीएल'च्या सुरूवातीलाच चेन्नईला मोठा धक्का; 'हा' दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्‍या संपूर्ण क्रिकेट विश्वात इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)चे वारे वाहत आहे. प्रत्येक संघ आपल्या संघाची बांधणी करण्यात व्यस्त आहेत. ‘आयपीएल’मधील संघ सरावालादेखील लागले आहेत. आयपीएल 2024 सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच गतविजेत्याचेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. त्याचा दिग्गज फलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने त्यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. आयपीएल 2024 हंगामाची सुरूवात दि. 24 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने होणार आहे. (Devon Conway)

आज (दि.4) न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले की, त्याचा स्टार सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे दुखापतग्रस्त झाला आहे. त्याला बरे होण्यासाठी किमान आठ आठवडे लागू शकतात. यामुळे तो आठ आठवडे क्रिकेटपासून दूर गेला आहे. कॉनवे चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आहे. आयपीएलच्या 2023 हंगामात चेन्नईकडून सर्वाधिक धावा कॉनवेने केल्या होत्या.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्याा माहितीनुसार, ऑकलंडमध्ये (दि. 24 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 दरम्यान कॉन्वे जखमी झाला होता. दुखापतीमुळे त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया होणार असून, त्याला बरे होण्यासाठी किमान आठ आठवडे लागणार आहेत. (Devon Conway)याची अधिकृत माहिती न्यूझीलंड क्रिकेटने त्यांच्या ब्लॅक कॅप्स या ट्विटर हँडलवरून दिली आहे. यात त्यांनी सलामीवीर डेव्हन कॉन्वेवर या आठवड्यात डाव्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान जखमी झाला होता. अनेक तपासण्या आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर आम्ही त्याचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.

डेव्‍हाॅन काॅन्‍वे याला पुन्‍हा मैदानावर उतरण्‍यासाठी किमान आठ आठवडे लागतील. त्‍यामुळे ताे आयपीएलच्या सुरूवातीला CSK च्‍या सामन्‍यांमध्‍ये खेळू शकणार नाही. कॉन्वे हा चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू आहे. 2022च्या लिलावात त्याला चेन्नईने 1 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. गेल्या वर्षी त्याने 16 सामन्यांमध्ये 672 धावा केल्या होत्या. यासह तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. यासोबतच तो आयपीएल 2023 च्या फायनलमधील सामनावीर ठरला होता. अंतिम फेरीत सीएसकेने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव केला होता.

…तर रचिन रविंद्र देणार सलामी

गुजरातविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात कॉन्‍वे याने २५ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली होती. आता त्‍याच्‍या अनुपस्थितीत रचिन रवींद्रसाठी दार उघडले आहे. रुतुराज गायकवाडसह तो सीएसकेसाठी सलामीवीर म्हणून पदार्पण करू शकतो. अष्टपैलू खेळाडू असल्याने तो संघासाठी खूप उपयुक्त कामगिरी करू शकतो. (Devon Conway)

रचिनने गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. या स्पर्धेत त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. या दरम्याने रचिनने 10 सामन्यात 64.22 च्या सरासरीने 578 धावा केल्या होत्या. यामध्ये 55 चौकार आणि 17 षटकारांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट 106.45 होता. तो न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. रचिनने या स्पर्धेत तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली. आयपीएल 2024 च्या लिलावात चेन्नईने त्याला 1.80 कोटी रुपयांना विकत घेतले. मात्र अद्याप चेन्नईने अद्याप कॉनवेच्या बदलीची घोषणा केलेली नाही.

हेही वाचा :

Back to top button