Nashik | सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत ट्विस्ट | पुढारी

Nashik | सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत ट्विस्ट

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक आज होत आहे. सभापती पदी कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वाजे- सांगळे व आमदार कोकाटे गटाला समसमान जागा मिळाल्या होत्या. मात्र कोकाटे गटाचा एक संचालक फोडण्यात वाजे- सांगळे गटाला यश आले होते. त्यामुळे गेल्या वीस-पंचवीस वर्षांची कोकाटे यांची सत्ता वाजे -सांगळे गटाने गटाने ताब्यात घेतली. तथापि तत्कालीन सभापती डॉक्टर रवींद्र पवार यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याने त्यांचे सभापती पद रद्द झाले. या पार्श्वभूमीवर आता सभापती पदाची निवडणूक होत आहे. मात्र या निवडणुकीतही चांगलाच ट्वीस्ट निर्माण झाला आहे. कोकाटे गटाचे दोन संचालक शिवसेना ठाकरे गटाला जाऊन मिळाल्याचे चर्चा असतानाच आता सहलीवर गेलेल्या या संचालकांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कोकाटे गटाचे संचालक फुटल्याचे समोर आले असून त्यापैकी एक संचालक असलेले शशिकांत गाडे यांना सभापती पदाची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.

गत वेळी फुटलेल्या संचालिका आणि विद्यमान उपसभापती सिंधुताई कोकाटे मात्र या फोटोमध्ये दिसत नाहीत. कोकाटे गटातून फुटून आल्यानंतर त्यांना बक्षीशी म्हणून उपसभापती पद मिळाले होते. आता शशिकांत गाडे यांनाही सभापती पद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येतात काही तासांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे तालुका वास यांची लक्ष लागले आहे.

वायरल झालेल्या फोटोमध्ये बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ यांच्यासह मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे ही दिसत आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button