हैदराबाद: पाच कंपन्यांच्या संचालिकाने टीव्ही अँकरचे केले अपहरण, बदला घेण्यासाठी असा रचला कट | पुढारी

हैदराबाद: पाच कंपन्यांच्या संचालिकाने टीव्ही अँकरचे केले अपहरण, बदला घेण्यासाठी असा रचला कट

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी एक घटना हैदराबाद येथे घडली आहे. हैदराबाद पोलिसांनी एका ३१ वर्षीय उद्योजिका महिलेला अटक केली आहे. एका टेलिव्हिजन म्युझिक चॅनलच्या अँकरचे अपहरण केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली. अँकरशी लग्न करण्यासाठी त्याचा पाठलाग करून अपहरण केल्याचा आरोप तिच्यावर आहे. भोगिरेड्डी त्रिशा असे तिचे नाव आहे. पाच स्टार्टअप कंपन्यांची व्यवस्थापकीय संचालक असल्याचे म्हटले जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही महिला एक व्यावसायिक आहे. टीव्ही अँकरला तिने लग्नाचा प्रस्ताव दिला होता. पण, हा प्रस्ताव त्याने नाकारल्याने बदला घेण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण ?

त्रिशाने टीव्ही म्युझिक चॅनेल अँकर प्रणवची प्रोफाईल मॅट्रिमोनियल वेबसाईटवर पाहिली आणि त्यानंतर प्रणवशी संपर्क केला. तेव्हा प्रणवने लग्नाचा प्रस्ताव नाकारला. अपहरणावेळी त्रिशाने आपल्या साथीदारांची मदत घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर प्रणवने आपला जीव वाचवत तेथून कसा तरी पळ काढला. त्याने पोलिसांना या घटनेची पूर्ण माहिती देत मदत मागितली.

मॅट्रिमोनियल साईटवर खोटे प्रोफाईल

तपासात समोर आले की, प्रणवची वैवाहिक प्रोफ़ाईल एका अज्ञात व्यक्तीकडून चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले होते. ही महिला दोन वर्षापूर्वी मॅट्रिमोनियल वेबसाईटच्या माधय्मातून चैतन्य रेड्डी नावाच्या एका अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात आली होती. पुढे जाऊन व्हाट्सॲप – इंस्टाग्रामवर चॅट करणे सुरू झाले. काही काळानंतर त्या व्यक्तीने चांगला परतावा देण्याचे वचन देत तिला आपल्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्रिशाने तथाकथित युपीआय माध्यमातून त्या व्यक्तीला ४० लाख रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर तो व्यक्ती या महिलेकडे दुर्लक्ष करू लागला.

नंतर तिला समजले की, वेबसाईटवर प्रोफाईल फोटो म्हणून त्याने स्वत:चा फोटो न लावता टीव्ही अँकरचा फोटो लावला होता.
आपल्यासोबत धोका झाला आहे, समजताच महिलाने त्या प्रोफाईलवर दिलेलेया फोनवर संपर्क केला, तो नंबर प्रणवचा निघाला. खरंतर चैतन्य रेड्डी नावाच्या अज्ञात व्यक्तीने अँकर प्रणवचा फोटो वापरला होता आणि मॅट्रिमोनीवर खोटं अकाऊंट बनवलं होतं.

अपहरणासाठी भाड्याने चार लोक घेतले

महिलाने अँकरला मेसेज पाठवणे सुरुच ठेवले. पोलिसांनी लांगितले की, यानंतर अँकरने महिलेचा नंबर ब्लॉक केला. अँकरशी लग्न करण्यावर ठाम असलेल्या महिलेने हे प्रकरण सोडवता येईल या विचाराने त्याचे अपहरण करण्याची योजना आखली. यानंतर त्याने अँकरचे अपहरण करण्यासाठी चार लोकांना त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सांगितले. अँकरच्या गाडीवर ट्रॅकिंग डिव्हाईस बसवले. यानंतर महिलेने अँकर प्रणवचे अपहरण करण्याचा कट रचण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, ११ फेब्रुवारीला चार भाड्याच्या लोकांनी अँकरचे अपहरण केले आणि त्याला महिलेच्या कार्यालयात नेले आणि त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी सांगितले की, आपल्या जीवाच्या भीतीने टीव्ही अँकरने त्या महिलेला सांगितले की, तुझ्या कॉलला उत्तर देईन. त्यानंतरच त्याला तेथून जाण्याची परवानगी मिळाली. नंतर त्याने उप्पल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला असून उप्पल पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. आता तिला न्यायालयात नेण्यात येईल.”

Back to top button