सूर्यावर पाच वर्षांतील चौथा मोठा स्फोट | पुढारी

सूर्यावर पाच वर्षांतील चौथा मोठा स्फोट

मॉस्को : खगोल शास्त्रज्ञांनी सूर्याच्या पृष्ठभागावर गेल्या पाच वर्षांच्या काळातील चौथा सर्वात शक्तिशाली स्फोट पाहिला आहे. सूर्यावरील या शक्तिशाली सोलर फ्लेअर म्हणजेच सौरज्वाळांनी संशोधकांना थक्क केले. शुक्रवारी दुपारी या घटनेची नोंद करण्यात आली. या सौरज्वाळा सूर्याच्या पृष्ठभागावरील ‘अक्टिव्ह झोन 3676’मधून उठत असताना दिसून आल्या. रशियन विज्ञान अकादमीच्या सौर खगोल विज्ञान प्रयोगशाळेने या घटनेची माहिती आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.

या प्रयोगशाळेच्या माहितीनुसार, सूर्यावरील हा स्फोट सूर्य-पृथ्वी अक्सिसपासून दूर सोलर सरफेसवर झाली आहे. या घटनेची नोंद ‘एक्स2.6’ अशी करण्यात आली. त्याचा अर्थ असा होतो की, कॅटलॉगनुसार हा पाच वर्षांमधील चौथा सर्वात मोठा सोलर फ्लेअर आहे. अर्थात, त्याचा पृथ्वीवर परिणाम होण्याची शक्यता नगण्य आहे. अशा घटनांमधून अंतराळात विखुरलेले जाणारे भारित कण उपग्रहप्रणाली, अंतराळ यान यांच्या कार्यात व्यत्यय आणू शकतात.

मात्र, चुंबकीय वादळ आणि अरोरा म्हणजेच आकाशातील रंगीबेरंगी प्रकाशझोत निर्माण होण्याची शक्यता पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. ही घटना जिथे घडली तिथेच काही दिवसांपूर्वी ‘एक्स3.3’ स्तरातील अन्य एका सोलर फ्लेअरची नोंद झाली आहे. सूर्याच्या एकाच क्षेत्रात सोलर सर्कलच्या आत दोन उच्च शक्तीचे स्फोट होण्याची ही पहिलीच घटना आहे. 1 जानेवारी 2024 मध्ये पाच वर्षांच्या काळातील सर्वात मोठ्या सोलर फ्लेअरची नोंद झाली आहे.

Back to top button