जपानी माणसाने कार्टूनशी केले लग्न! | पुढारी

जपानी माणसाने कार्टूनशी केले लग्न!

टोकियो : जगभरात विचित्र माणसांची अजिबात कमतरता नाही. विशेषतः लग्नाबाबतही अनेक लोक भन्नाट प्रकार करीत असतात. एक जपानी माणूस तर एका कार्टून कॅरेक्टरच्या इतका प्रेमात पडला की, त्याने आधी त्या कार्टूनची माणसासारखी दिसणारी बाहुली बनवली आणि मग तिच्याशी लग्न केलं!

अकिहिको कोंडो नावाचा हा माणूस बर्‍याच दिवसांपासून या कार्टून कॅरेक्टरच्या प्रेमात होता. त्याने या कार्टूनमधील पात्राशी लग्नही केले! सध्या तो एका नवीन प्रकारच्या नात्याचा प्रचार करत आहे. या नात्याचं नाव आहेफिक्टोसेक्शुअल’, म्हणजेच असं नातं ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या काल्पनिक पात्राच्या प्रेमात पडते आणि तिच्यासोबत राहण्याचं स्वप्न पाहू लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अकिहिको याने असं करण्यामागचं अचाट कारणही सांगितलं. अकिहिको या जपानी व्यक्तीने सांगितलं की, लोक त्याला वेडा, विचित्र आणि मानसिकद़ृष्ट्या आजारी व्यक्ती म्हणायचे.

या कारणामुळे त्याने ‘फिक्टोसेक्सुअल असोसिएशन’ची सुरुवात केली, ज्याद्वारे त्याला लोकांना या नवीन प्रकारच्या नातेसंबंधाची माहिती देता येईल. सध्या त्याच्या या असोसिएशनमध्ये केवळ चार सदस्य आहेत. अकिहिकोचं असं म्हणणं आहे की, तो तर या कार्टून पात्राच्या प्रेमात तर आहेच. परंतु, त्याला जगाला या नवीन प्रकारच्या प्रेमाबद्दल सांगायचं आहे आणि त्यामुळे त्याने या कार्टून कॅरेक्टरशी लग्न केलं. अकिहिको हे 40 वर्षांचे असून ते जपानी सरकारच्या नोकरीत काम करतात. त्यांनी 2018 मध्ये कार्टून कॅरेक्टरच्या डॉलशी लग्न केलं. अकिहिकोने या लग्नासाठी 13 लाखांपेक्षा जास्त खर्च केला होता. या विवाह सोहळ्याला एकूण 40 पाहुणे उपस्थित होते.

Back to top button