Lok Sabha election 2024 : स्वाभिमानी राज्यातील लोकसभेच्या ६ जागा स्वबळावर लढविणार | पुढारी

Lok Sabha election 2024 : स्वाभिमानी राज्यातील लोकसभेच्या ६ जागा स्वबळावर लढविणार

राशिवडे; पुढारी वृत्तसेवा : माढा, सांगली, परभणी, बुलढाणा, हातकणंगले आणि कोल्हापूर या सहा लोकसभेच्या जागा स्वाभिमानी संघटना स्वबळावर लढविणार आहे. हातकणंगलेतून राजू शेट्टी, सांगलीतून जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणात स्वत: उतरणार असल्याची माहीती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. तर राज्यातील इतरही लोकसभा लढविण्या संदर्भात अनेकजण संपर्कामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. पाटील पुढे म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून २५ वर्षापासून शेतकऱ्यांसाठी लढा देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहे. जनतेने मनात आणले तर राजू शेट्टीसोबत कष्टकरी शेतकऱ्यांचा प्रतिनिधीही जाऊ शकतो. सध्या सुरु असणारे घाणेरडे राजकारण आणि पारंपरिक राजकीय लोकांची संपत चाललेली विश्वासार्हता यामुळे स्वाभिमानीच्या कष्टकरी शिलेदारांना सोबत घेऊन प्राथमिक टप्प्यात सहा जागा लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्यातील अन्य लोकसभेच्या जागासाठीही अनेक राजकीय पक्ष, लोक संपर्कामध्ये असून लवकरच निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानीचे अजित पोवार, रमाकांत तोडकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button