शाश्वत विकासाचा विरार- अलिबाग कॉरिडॉर | पुढारी

शाश्वत विकासाचा विरार- अलिबाग कॉरिडॉर

निखिल मेस्त्री

पालघर : विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर या बहुउद्देशीय प्रकल्पामुळे विकासाच्या नव्या संधी प्राप्त होणार आहेत. प्रकल्पामुळे रोजगार, स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन हा मार्ग जाणार्‍या भागांचा शाश्वत विकास होणार आहे.

हे आहेत फायदे…

विरार आणि अलिबाग दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्यावर येईल. हा प्रकल्प मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखला होता, तर त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) दोन टप्प्यांत होणार आहे.
प्रकल्प रायगड, ठाणे आणि पालघर यांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8, भिवंडी बायपास महामार्ग 3 व 4 ब आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेने महामार्ग क्रमांक 17 ला जोडणार आहे.
कॉरिडॉरच्या प्रथम टप्प्यात नवघर ते बलावली दरम्यान 96.41 कि.मी. लांबीचा महामार्ग तयार केला जाणार आहे, तर टप्पा 2 हा बलावली आणि अलिबाग दरम्यानचा 29.9 कि.मी. लांबीचा महामार्ग असेल.

असा आहे प्रकल्प…

विरार-अलिबाग प्रकल्पासाठी सरकार एमएमआर क्षेत्रामध्ये रिंग रूट तयार करण्याची योजना बनवत आहे. त्यासाठी एमएमआरएमध्ये तयार होत असलेल्या सर्व प्रकल्पांना एकमेकांसोबत जोडण्यात येणार आहे. याअंतर्गत विरार-अलिबाग कॉरिडॉर, शिवडी-न्हावासेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रोजेक्ट, शिवडी-वरळी कनेक्टर, वसई-भाईंदर पूल, कोस्टल रोड, वर्सोवा-वांद्रे सी लिंक आणि वांद्रे-वरळी सी लिंकसह अन्य प्रकल्पांसोबत जोडले जाणार आहे. यातील शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकवरून प्रवास करता येणार आहे.

व्यावसायिक विकास साध्य होणार

विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, तलोजा आणि उरणसह एमएमआर क्षेत्राच्या सात विकासकेंद्रांना बळकटी मिळणार आहे. पनवेल, उरण, कल्याण, तळोजा, कल्याण-शिळ रोड, विरार, वसई आणि पेण यांसारख्या परिसरांमध्ये व्यावसायिक विकास साध्य होणार आहे.

55,000 कोटी
प्रकल्पाची एकूण अंदाजे किंमत
2030 पर्यंत
प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा
120 कि.मी.
प्रतितास धावतील वाहने

विरारहून अलिबागचा प्रवास दीड ते दोन तासांत करणे शक्य

सध्या विरारहून अलिबागला पोहोचण्यास लागतात 4 ते 5 तास

2016 मध्ये आराखडा, गेल्या काही वर्षांत अनेक लहान-मोठे बदल

कॉरिडॉरच्या बांधकामाची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाकडे

Back to top button