IND vs ENG 3rd Test : शुभमन गिलला शतकाची हुलकावणी; ९१वर धावबाद | पुढारी

IND vs ENG 3rd Test : शुभमन गिलला शतकाची हुलकावणी; ९१वर धावबाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : पहिल्या डावात ० धावांवर बाद झालेल्या शुभमनने दुसऱ्या डावात शानदार खेळी करत अपयश धुण्याचा प्रयत्न केला. परंतु, सामन्याच्या ६४ व्या षटकात तो ९१वर कुलदीपच्या कॉलवर बाद झाला. त्याला बेन स्टोक्सने धावबाद केले. त्याने आपल्या खेळीत १५१ चेंडूमध्ये ९१ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावले. शुभमन गिल दुसऱ्या डावात शतकाला मुकला असला तरी त्याचा ९१ धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.  (IND vs ENG 3rd Test)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील राजकोट कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा (दि. १७) खेळ संपला तेव्‍हा भारताने दुसऱ्या डावात २ गडी गमावत १९६ धावा केल्‍या आहेत. यशस्‍वी जैस्‍वालचे शतक आणि शुभमन गिलच्‍या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला या सामन्‍यात 322 धावांची निर्णायक आघाडी मिळाली आहे. (IND vs ENG 3rd Test)

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्‍हा. शुभमन गिल ६५ तर कुलदीप यादव ३ धावांवर खेळत आहेत. यशस्वी जैस्वाल 104 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. इंग्लंडकडून जो रूट आणि टॉम हार्टली यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा 19 धावांवर तर ​​रजत पाटीदार खाते न उघडता बाद झाला. टीम इंडियाने भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. तर इंग्‍लडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटाेपला. (IND vs ENG 3rd Test)

दुसर्‍या डावात जैस्वालचे दमदार शतक, शुभमनचे अर्धशतक

तिसर्‍या दिवसाचा (१८ फेब्रुवारी) खेळ संपला तेव्‍हा भारताने २ गडी गमावत १९६ धावा केल्‍या. यशस्वी जैस्वाल याने 122 चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजीत करत त्‍याने दमदार शतकी खेळी साकारली. राेहित १९ धावांवर बाद झाल्‍यानंतर जैस्‍वाल आणि शुभमन यांनी भारताचा डाव सावरला. या जाेडीच्‍या शतकी भागीदारीमुळे भारताने दुसऱ्या डावात 1 विकेट गमावून दीडेश धावांचा टप्‍पा पूर्ण केला. शुभमन गिलने याने फिरकीपटू मार्क वुडला षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह संघाच्या एकूण आघाडीने 300 धावांचा टप्पाही पार केला.

हेही वाचा :

Back to top button