माझी कोणाशी वैयक्तिक लढाई नाही : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

माझी कोणाशी वैयक्तिक लढाई नाही : खा. सुप्रिया सुळे

बारामती : बारामतीतून कोणीही उभे राहू द्या. माझी कोणाशी वैयक्तिक लढाई नाही, माझी वैचारिक लढाई आहे. त्यांच्या विचारांचा कोणी तरी लढेलच, त्यात नवीन काय, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. बारामतीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचे ठरत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी लढाई ही वैयक्तिक नसून, वैचारिक असल्याचे सांगितले. वडिलांच्या नावे घर असेल, तर तुम्ही वडिलांना घराबाहेर काढाल का?

असे सांगत त्यांनी पक्षफोडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. त्या म्हणाल्या की, बारामतीत सुरू केलेले नवे कार्यालय हे प्रत्येकाचे हक्काचे कार्यालय आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न आमच्याकडून होतील. शरद पवार यांचे सहा दशकांचे नाते या कार्यालयात उलगडून दाखविले आहे. बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हक्क दाखविणार का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, माझा तो स्वभाव नाही. हक्क दाखविण्यात नव्हे, तर लोकांचे प्रेम मिळविण्यात मजा असते, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा

Back to top button