बीड; पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कापसाचे पीक घेऊनही कापसाला योग्य हमीभाव मिळाला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्याने शुक्रवारी (दि.१६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापूस उधळत आंदोलन केले. श्रीराम कोरडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. महागाईमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. तरीही बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शुक्रवारी माजलगाव येथील श्रीराम कोरडे या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापसाच्या हमीभावासाठी आनोखे आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापूस उधळत या शेतकऱ्याने सरकारविरोधात घोषणाबाजी केली. माझ्या कापसाला हमीभाव मिळाल्याशिवाय येथून कोणालाही जाऊ देणार नाही, असे म्हणत त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची वाहतूक रोखली.
हेही वाचा :