Mumbai Megablock : रेल्वे मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना चांगलाच फटका | पुढारी

Mumbai Megablock : रेल्वे मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना चांगलाच फटका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : रविवारी तिन्ही मार्गांवर सिग्नल यंत्रणा आणि इतर कामानिमित्त रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेतल्याने रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल झाल्याचे दिसून आले. वीस ते पंचवीस मिनिटे लोकल उशिराने धावत होत्या. त्यामुळे बहुतेक प्रवाशांना आपल्या हव्या त्या ठिकाणी पोहोचण्यास दोन ते तीन तास उशीर झाला होता. त्यामुळे नागरिकांना याचा चांगलाच फटका बसला. ( Mumbai Megablock )

संबंधित बातम्या 

मध्य रेल्वेवर माटुंगा – ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते 3.35 पर्यंत मेगाब्लॉक होता. तर, पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला.

माटुंगा – ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14. ते दुपारी 3.09 या वेळेत सुटणार्‍या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.

यामध्ये शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान गाड्यांची वाहतूक सुरळीत सुरू होती. पुढे ठाणे स्थानकावर धिम्या मार्गावर वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे अर्धा तास लोकल उशिराने धावत होत्या. ( Mumbai Megablock )

कल्याण येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आली आणि ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर गाडया थांबत. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आणि निर्धारित वेळेपेक्षा 20 ते 25 मिनिटे उशिराने होत्या. पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू होती. तसेच ट्रान्स हार्बरवरही मेगाब्लॉक घेण्यात आला.

Back to top button