Rape Case : आईने जेवायला घरी बोलावले सांगत अल्पवयीन मुलीवर बलात्कार | पुढारी

Rape Case : आईने जेवायला घरी बोलावले सांगत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आईने जेवायला घरी बोलावले आहे म्हणत अल्पवयीन मुलीला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकारणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक रामकृष्ण निमकरडे (वय 19, येवलेवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 16 वर्षीय मुलीने कोंढवा पोलिस ठाण्यात बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमानुसार फिर्याद दिली. हा प्रकार 20 नोव्हेंबर आणि 7 डिसेंबर रोजी आरोपीच्या राहत्या घरी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडिता हे ओळखीचे आहेत.

मुलगी कॉलेजला गेली असताना आरोपीने तिला तुला माझ्या आईने जेवणासाठी बोलवले आहे असे सांगितले. त्यानंतर तो तिला दुचाकीवरून त्याच्या घरी घेऊन गेला. घरी गेल्यानंतर घरी कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. तसेच, ’तिला तू या प्रकाराबद्दल कोठे सांगितल्यास मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल.’ म्हणत या अत्याचारानंतर तिला पुन्हा दुचाकीवरून तिच्या घरी सोडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button