पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला धडा शिकवण्याच्या नादात प्रियकर बनला गुन्हेगार | पुढारी

पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला धडा शिकवण्याच्या नादात प्रियकर बनला गुन्हेगार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला धडा शिकवण्याच्या नादात पहिला प्रियकरच गुन्हेगार होऊन बसला आहे. नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी त्याला छत्तीसगडमधील राजनांदगाव येथून अटक केली. सुधांशू मुकेश पात्रे (वय २५) असे संशयित तरुणाचे नाव आहे.

संबंधित बातम्या : 

चार वर्षांपूर्वी त्याची फेसबुकवर एका खासगी कंपनीत अधिकारी असलेल्या तरुणीसोबत मैत्री झाली होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिने त्याच्यावर इतका विश्वास टाकला की, ई-मेल व मोबाईलचे पासवर्डदेखील त्याला सांगितले. काही काळाने दोघांच्याही नात्यात दुरावा आला. त्यानंतर तरुणीचे एका परिचयातील व्यक्तीवरच प्रेम जडले. त्यांचे खासगी क्षण त्यांनी मोबाईलमध्ये कैद केले व ती क्लिप तरुणीने क्लाऊड स्टोअरेजमध्ये सेव्ह केली होती. सुशांधूकडे तरुणीच्या मोबाईल व मेलचा पासवर्ड होता. त्याने त्याचा वापर करत क्लिप्स मिळवल्या. त्याने त्या क्लिप्स तरुणी व तिच्या नव्या प्रियकराला पाठविल्या. यामुळे दोघेही घाबरले. सुधांशूने तरुणीकडे पाच लाखांची मागणी केली.

असे पकडला गेला…

तरुणीने बेलतरोडी पोलिस ठाण्यात आपबिती सांगितली. पोलिसांनी सुधांशूचे नेमके लोकेशन शोधून त्याला ताब्यात घेतले व नागपुरात आणले.

हेही वाचा : 

Back to top button