आरटीओची लर्निंग लायसन्स सुविधा ठप्प; वाहनचालक उमेदवारांचे हाल | पुढारी

आरटीओची लर्निंग लायसन्स सुविधा ठप्प; वाहनचालक उमेदवारांचे हाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आवश्यक असलेली सारथीची प्रणाली गेल्या दोन दिवसांपासून ठप्प झाली. त्यामुळे गुरुवारी, शुक्रवारी पुणेकर वाहनचालक उमेदवारांचे प्रचंड हाल झाले. आरटीओ कार्यालयातील लायसन्स सेवा बंद झाल्याने अनेकांच्या नियोजित अपॉइंटमेंट पुढे ढकलाव्या लागल्या.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व सेवा आता फेसलेस करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे वाहनांच्या कागदपत्रांसंदर्भातील कामकाज ’सारथी’ आणि ’वाहन’ या प्रणालीवर चालते. मात्र, या प्रणालीचा सर्व्हर बंद झाल्यामुळे कच्चा परवान्याची कामे रखडली. त्यामुळे शहरातील नागरिकांना पुणे आरटीओ कार्यालयात चकरा माराव्या लागल्या. चकरा मारूनही अनेकांची कामे पूर्ण न झाल्याने अनेक नागरिक नाराज झाले.

गुरुवारी 1 तारखेपासून लर्निंग लायसन्ससाठी आवश्यक असलेली ’सारथी’ ही प्रणाली बंद झाली होती. मात्र, शुक्रवारी 2 तारखेला सायंकाळी 4.30 नंतर ही प्रणाली सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांची रखडलेली कच्च्या परवान्याची कामे आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.

– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

हेही वाचा

Back to top button