Pushpa 2 : अखेर ठरलं! अल्लू अर्जून- रश्मिकाच्या ‘पुष्पा २’ ची रिलीज डेट | पुढारी

Pushpa 2 : अखेर ठरलं! अल्लू अर्जून- रश्मिकाच्या 'पुष्पा २' ची रिलीज डेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना याच्या ‘पुष्पा’ चित्रपट पडद्यावर हिट झाल्यापासून त्याच्या सीक्कवलची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान निर्मात्यांनी ‘पुष्पा २’ ( Pushpa 2 ) लवकरच येणार असल्याची घोषणा करत चित्रपटाचे शूटिग सुरू असल्याचे सांगितले होते. आता अल्लू आणि रश्मिकाच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेटस मिळत आहे. अनेक दिवासाची प्रतिक्षा संपली असून ‘पुष्पा २’ याच वर्षी प्रदर्शित होणार असून त्याची रिलीज डेट समोर आली आहे.

संबंधित बातम्या 

‘माय थ्री’ या प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच ‘पुष्पा 2’ ( Pushpa 2 ) चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, ‘आता चित्रपट रिलीज होण्यासाठी केवळ २०० दिवस शिल्लक आहेत. २०२१ मध्ये ‘पुष्पा: द राइज’ च्या रेकॉर्डब्रेक यशानंतर आता ‘पुष्पा 2: द रुल’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.’ यावरून हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट चाहत्यांच्या भेटीस येणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनंतर चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि साऊथ स्टार अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्नाही दिसणार आहे. अभिनेता फहाद फासिल हा देखील या चित्रपटाचा एक भाग असमार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जूनच्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा २’ चं पहिले पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. यानंतर अल्लूच्या चाहत्यांना चित्रपटासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यानंतर आता हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येत आहे.

Back to top button