‘पंड्या स्टोअर’ मालिकेत आदित्य नारायणची खास एन्ट्री | पुढारी

‘पंड्या स्टोअर’ मालिकेत आदित्य नारायणची खास एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : आदित्य नारायण ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पंड्या स्टोअर’च्या विशेष भागात खास उपस्थित राहणार आहे. २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ‘स्टार प्लस’वर हे विशेष भाग प्रसारित होणार आहेत. ‘पंड्या स्टोअर’ मालिकेच्या विशेष दुहेरी भागांमधील उपस्थितीविषयी आदित्यने आपले मनोगत व्यक्त केले.

संबंधित बातम्या –

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील मालिका ‘पंड्या स्टोअर’चे प्रत्येक दिवशी दोन भाग संपूर्ण आठवडाभर प्रसारित केले जाणार आहेत. २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत रोज संध्याकाळी ६ वाजता आणि संध्याकाळी ७.३० वा. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर दोन विशेष भाग प्रसारित केले जातील.

बॉलीवूडचा युवा गायक आदित्य नारायण २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान संध्याकाळी ६ वाजता आणि नंतर संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणाऱ्या विशेष दुहेरी भागांमध्ये ‘पंड्या स्टोअर’ मालिकेत खास उपस्थित राहणार आहे.

‘पंड्या स्टोअर’ कुटुंबासोबत मंच शेअर करताना आदित्य नारायणचे जादूई सादरीकरण पाहणे ही प्रेक्षकांकरता एक दृक् मेजवानी असेल! गायक आदित्य नारायण धवल आणि नताशा यांना एकत्र आणून त्यांच्यात प्रेमाचे धागे विणले जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसते.

याबाबत युवा गायक आदित्य नारायण मनोगत व्यक्त करताना म्हणाला, “पंड्या स्टोअर’ ही घरोघरी आवर्जून बघितली जाणारी लोकप्रिय टीव्ही मालिकांपैकी एक आहे, ज्या मालिकेला प्रेक्षकांचे अतोनात प्रेम मिळाले आहे आणि त्यातील पात्रे तर घराघरांत चांगलीच परिचयाची झाली आहेत. अशा उत्साहात, ‘पंड्या स्टोअर’ने एक हजार भागांचा मैलाचा दगड पूर्ण केला आहे. हा माझ्याकरीता थरारक अनुभव आहे.

कथा पडद्यावर जशी रंजक दिसते, तशीच कॅमेऱ्याच्या पलीकडेही या कलाकारांमधील भावनिक नातेसंबंध आश्चर्यकारक आणि खूप मजेदार आहेत! धवलचे घरी स्वागत करण्यासाठी आयोजित उत्सवात मी सहभागी होणार आहे. मकवाना कुटुंब आणि मी एकत्र येत आहोत, तेव्हा आमच्या आनंदात सहभागी होण्याकरता आम्ही तुम्हांला आमंत्रित करत आहोत. हा एक जादुई उत्सव असणार आहे!”

Back to top button