नोजल निखळल्याने जपानी अंतराळ यानाला अपयश | पुढारी

नोजल निखळल्याने जपानी अंतराळ यानाला अपयश

वॉशिंग्टन : जपानी अंतराळ एजन्सीच्या स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिंग मून अर्थात स्लिमचे लँडिंग का चुकले, याचा ठावठिकाणा चंद्राची प्रदक्षिणा करणार्‍या नासाच्या एका अंतराळ यानाने शोधला आहे. मागील आठवड्यात हेे अंतराळ यान चंद्राच्या पटलावर उतरले. मात्र, त्याचे लँडिंग पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नव्हते. स्लिमचे छोटे रोव्हर लेव्ह-2 मधून एका बाजूने लँडरचे अतिशय सुस्पष्ट छायाचित्र घेतले गेले होते. यामध्ये लँडर उलट उतरत असल्याचे दिसून आले. आता नासाच्या सॅटेलाईट छायाचित्रावरून असे आढळून आले की, उतरताना या इंजिनचे एक नोजल निखळून पडले होते.

स्लिमने 20 जानेवारी 2024 मध्ये चंद्राच्या पटलावर लँडिंग केले. मात्र, त्याचे लँडिंग नेमके उलटे झाले आणि लँडरचा सोलर सेल सूर्याच्या दिशेने राहू शकला नाही. याच कारणामुळे वीजनिर्मिती होऊ शकली नाही आणि सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. जापनीज एजन्सीला आताही सूर्याचा कोन बदलल्यानंतर रिचार्ज सुरू होईल, अशी आशा आहे. मात्र, रिझर्व्ह बॅटरीच्या अडीच तासातही असे काहीही होऊ शकले नव्हते. त्यादरम्यान नासाने टिपलेल्या सॅटेलाईट छायाचित्रामुळे वेगळीच वस्तुस्थिती समोर आली आहे.

Back to top button