Maratha Aarakshan : मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा इतिहास आणि घटनाक्रम | पुढारी

Maratha Aarakshan : मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा इतिहास आणि घटनाक्रम

मंबई; पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये प्रसिध्दीच्या लोत्तात येण्यापूर्वी २०११ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून ३५ वेळा आंदोलन केले. २००४ पासून ते या मागणीसाठी विविध आंदोलनांमध्ये सक्रिय होते.
२०१६-२०१७- मराठा आरक्षणासाठी या काळात ६० च्या वर मुकमोर्चाचे आयोजन.

  • १ डिसेंबर २०१८- मराठा आरक्षण कायदा राज्यात लागू, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण.
  • ५ मे २०२१- सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले.
  • २९ ऑगस्ट २०२३ मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू.
  • ०१ सप्टेंबर २०२३ पोलिसांनी उपोषण स्थळी जमलेल्या लोकांवर लाठीमार केल्याने आंदोलन प्रसिध्दीच्या झोतात, आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार.
  • १४ सप्टेंबर २०२३- राज्य सरकारच्या विनंतीनंतर उपोषण मागे घेतले. न्या. शिंदे समितीची स्थापना करून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याची सरकारवी तयारी उपोषण मागे घेताना सरकारला ४० दिवसांची मुदत दिली.
  • २४ ऑक्टोबर २०२३- सरकारने विहित मुदतीत सरसकट आरक्षणाचा निर्णय न घेतल्याने पुन्हा उपोषण सुरू, नेत्यांना गावबंदी करण्याची घोषणा.
  • ०२ नोव्हेंबर २०२३- सरकारच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे. ०२ जानेवारीपर्यंत सरसकट आरक्षणासाठी सरकारला मुदत दिली.
  • १९ डिसेंबर २०२३ राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यावर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.
  • २८ डिसेंबर २०२३- मराठा समाजाला आरक्षण देण्यास अक्षम्य विलंब होत असल्याबद्दल आणि सगसोयरे श्री मागणी मान्य होत नसल्यामुळे मुंबईकडे २० जानेवारीस कूच करण्याची घोषणा.
  • २० जानेवारी २०२४- अंतरवाली सराटीहून लाखोंच्या मोच्यनि मंबईकडे प्रयाण • २५ जानेवारी २४- नवी मुंबईतील वाशीत पहाटे आगमन, सगेसोयरे मागणीचा पुनरुच्चार २६ जानेवारी २४- वाशीत जाहीर सभा आणि मुंबईत २७ जानेवारीला जाण्याचा इशारा, राज्य सरकारकडून यशस्वी वाटाघाटी.
  • २७ जानेवारी २४- कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोय-यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकार राजी, आंदोलनात विजयाचा जल्लोष.
  • मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः दिला अधिसूचनेचा मसुदा.
  • नवी मुंबईतील आंदोलन संपवून जरांगे पाटील अंतरवाली सराठीत पोहोचले.

Back to top button