Maharashtra Politics | मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊतांना नोटीस, नेमकं प्रकरण काय? | पुढारी

Maharashtra Politics | मुख्यमंत्री शिंदेंची संजय राऊतांना नोटीस, नेमकं प्रकरण काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी “अब आयेगा मजा!!” असं म्हणतं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. Maharashtra Politics

नेमकं प्रकरण काय?

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  खासदार संजय राऊत यांना नोटीस पाठवली आहे
  • तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे
  • नोटीसीनंतर सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे, “ही त्यांची निव्वळ कवी कल्पना”

काय म्हटले आहे नोटीसमध्ये?

“नितीन गडकरी यांच्या प्रचारात फडणवीस नाईलाजाने उतरले, एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटले… असे अनेक आरोप खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनामधील रोखटोक या सदरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधी सल्लागाराने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच तीन दिवसांच्या आत माध्यमांसमोर बिनशर्त माफी मागावी, असे या नोटीशीद्वारे सांगण्यात आले आहे. अन्यथा संजय राऊत आणि दैनिकाला फौजदारी आणि दिवाणी स्वरुपाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. Maharashtra Politics

 मानहानीची नोटीस पाठवत, तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. नोटीसमध्ये म्हटलं आहे की, सामनामध्ये २६ मे रोजी एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघात पैसे वाटल्य़ाचा आरोप केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्यावरीलही आरोपही बदनामकारक असल्याच म्हटलं आहे. पुढे नोटीसमध्ये म्हटलं आहे की, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक दरम्यान पैसे वितरीत केले असतील तर त्याचे पुरावे सादर करा. आमच्यावर आरोप करुन अपप्रचार केला जात आहे, लोकांचे लक्ष विचलित केले जात आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना नोटीस पाठवली आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियावर ती नोटीस शेअर करत, अब आयेगा मजा!! अशी प्रतिक्रिया दिली आहे.

निव्वळ कवी कल्पना : सुषमा अंधारे

या नोटीसनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर संजय राऊत यांची पोस्ट रिपोस्ट करत म्हटलं आहे, “Lol.! निवडणुकीच्या काळात पैसे वाटत असल्याचा मीनाक्षी शिंदे नावाच्या महिलेचा व्हिडिओ मी स्वतः ट्विट केला होता. यावर काय म्हणणे आहे सरकारचे? अशा नोटिसा पाठवून विरोधकांचा आवाज दाबता येतो असे सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर ही त्यांची निव्वळ कवी कल्पना आहे.

हेही वाचा 

Back to top button