माजी आमदारांचा आत्महत्येचा प्रयत्न ; वीज बिलासाठी आक्रमक | पुढारी

माजी आमदारांचा आत्महत्येचा प्रयत्न ; वीज बिलासाठी आक्रमक

नेवासा; पुढारी वृत्तसेवा

नेवासा तालुका भाजपा व शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवारी (दि.२३) नेवासा वीज कंपनीच्या कार्यालयात सुमारे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले, यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आंदोलनास यश न येण्याचे दिसताच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंनी वीज कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली.

या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार व किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी केले. माजी आमदार मुरकुटे व विठ्ठलराव लंघे यांनी कंपनीच्या कार्यकारी अधिका-यांना, सध्या शेतकरी कसा अडचणीत असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांकडे कुठलेही पिक सध्या हातात नाही. साखर कारखाने नुकतेच चालू झाल्याने, अजून शेतकऱ्यांकडे उसाचेही बील आलेले नाही. त्यामुळे आम्हाला एक महिन्याची मुदत द्यावी व आत्ता वीज कंपनीने तीन हजार रुपये प्रती वीज पंपाप्रमाणे भरून घ्यावे.
परंतु वीज कंपनीचे अधिकारी ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यानंतर नेवासाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये तोडगा न निघाल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वीज कंपनीच्या कार्यालयामध्ये फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

मुरकुटे व लंघे यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही फोन करून चर्चा केली. तरीही त्यावर ती तोडगा निघाला नाही. कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत ऑफिसमध्येच ठिय्या आंदोलन केले. नंतर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी मध्यस्थी करून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांसाठी रोज एक तास वीज चालू ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन वीज बिलांची होळी करून आंदोलन मागे घेण्यात आले. या आठवडय़ातच नेवासा तहसीलवर भव्य ट्रॅक्टर मोर्चा नेऊन कृषी पंपाचे वीज आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे मुरकुटे व लंघे यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, राजू मते, अशोक टेकणे, बाळासाहेब शिरसागर, नगरसेवक सुनील वाघ, मनोज पारखे, विश्वासराव काळे, येडूभाऊ सोनवणे, कैलास दहातोंडे, आप्पासाहेब आयनर, दिगंबर गोंधळी,कल्याण मते, निवृत्ती जावळे, विशाल धनगर, अण्णा गव्हाणे,रमेश घोरपडे,बाबा डुकरे, राजेश कडू, संभाजी गडाख, अरुण चांदगुडे, विशाल धनगर, सुभाष पवार, महिंद्रआगळे, दिलीप नगरे, बाबासाहेब शिंदे, बी. के. डुकरे, राजेंद्र जाधव,किरण जावळे, बापूसाहेब डिके, रमेश घोरपडे, कानिफनाथ सावंत, उमेश चावरे, आदिनाथ पटारे, अरुण निपुंगे, रमेश महानुर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचा :

Back to top button