मध्यप्रदेशच्या ‘या’ शिक्षकाने चक्क पत्नीसाठी बनवला ताजमहल

मध्यप्रदेशच्या ‘या’ शिक्षकाने चक्क पत्नीसाठी बनवला ताजमहल
Published on
Updated on

प्रियकर आपल्या प्रियसीस किंवा अनेक पती आपल्या पत्नीस असे म्हणताना आढळतात की तुझ्यासाठी मी चंद्र तारे तोडून आणेन, मी ताजमहल बनवेन वगैरे वगैर. असे कितीतर संवाद आपण चित्रपटात देखिल ऐकेले असतील. पण हे फक्त प्रेम व्यक्त करण्याचे प्रतिक म्हणून बोलले जाते किंवा याला आपण विनोदी ढंगाने घेतो. शिवाय असं कोणी म्हटंल तरी आपण त्याला वेड्यात काढू.

सध्या युग हे २१ व्या शतकातील आहे. येथे काहीही शक्य आहे असं म्हटलं जातं. सध्या चंद्रावर आणि मंगळावर पर्यटनासाठी जाण्याची तयारी सुरु झाली आहे. तसेच चंद्रावर आणि मंगळावर जागा खेरदी करण्याची तयारी सुरु झाली. त्यामुळे प्रेमात दिल्याजाणाऱ्या आणाभाका सुद्धा खरे ठरु शकतात. कारण अशीच एक घटना मध्यप्रदेश मध्ये घडली आहे. मध्यप्रदेश मधील एका शिक्षकाने आपल्या पत्नीसाठी चक्क ताजमहल बांधला आहे. त्यांनी प्रति ताजमहल असलेलं घर पत्नीला भेट म्हणून दिलं आहे.

मध्यप्रदेश मधील बुऱ्हानपूर येथील शिक्षक आनंद प्रकाश चौकसे यांनी आपल्या पत्नी प्रेमाचे प्रतिक म्हणून प्रति ताजमहल असणारे आलिशान घर भेट म्हणून दिलं आहे. आनंद यांच्या मनात एक प्रश्न कायम घर करुन होता. की बादशाह शहाजहान याने त्याची पत्नी मुमताज साठी जे ताजमहल बनवलं ते बुऱ्हानपूर मध्येच का बनवलं नाही. याचं एक हे ही कारण आहे की, मुमताज हीचा मृत्यू हा बुऱ्हानपूर येथेच झाला होता. म्हणूनच कदाचित बुऱ्हानपूर ऐवजी आग्रा हे ठिकाण बादशाह शाहाजहान यांनी निवडलं असावं. असो बादशाहचं कारण जे असेल ते पण, आनंद यांनी ठरवलं की माझ्या बायकोसाठी मी बुऱ्हानपूर मध्ये ताजमहल उभा करणार.

आनंद यांनी उभा केलेलं प्रति ताजमहल खऱ्या ताजमहलच्या एकतृतियांश आहे. याची निमिर्तीसाठी ३ वर्षांचा कालावधी लागला. या घराचा घुमट तब्बल २९ फूट उंचीचा आहे. जो या घराला हुबेहुब ताजमहला लूक देतो. या घरामध्ये चार बेडरुम आहेत. किचन आणि लायब्ररी सहीत आणखी काही खोल्या आहेत. घराच्या बाहेर ताजमहल सारखेच चार मिनार उभे करण्यात आले आहेत. हे घर बनविण्यासाठी आनंद यांनी कित्येकवेळा ताजमहलला भेट दिली. ताजमहलची जवळून पाहणी केली. शिवाय त्याच्या ३ डी एमेजचा देखिल सखोल अभ्यास केला.

या घराचे डिझाईन चीफ आर्किटेक्ट प्रवीण चौकसे यांनी केले आहे. घराच्या बाधणीसाठी मकरान मार्बलचा वापर करण्यात आले आहे. भितींवर ताजमहल सारखे सौदर्यं येण्यासाठी आगरा आणि राजस्थाच्या कारगीरांची मदत घेण्यात आली. फर्निचरला या घराशी मिळतंजुळतं करण्यासाठी सूरत येथील कारागिरांची मदत घेण्यात आली.

आजच्या युगात ५२ वर्षांच्या आनंद यांनी आपल्या पत्नीसाठी ताजमहल बनवून दाखवला आहे. त्यामुळे इतरजण सुद्धा त्यांच्या पत्नीस ताजमहल बनविण्याचे आश्वासन देऊन पूर्ण करु शकतात. हेच आंनद यांनी दाखवून दिले. फक्त करण्याची जिद्द आणि कलादृष्टी असेल तर अश्यक्यप्राय गोष्ट देखिल शक्य होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news