‘सोन्याचा मुकुट, हार आणि धनुष्य…’ प्राणप्रतिष्ठावेळचा रामलल्‍लाचा मनमोहक शृंगार | पुढारी

'सोन्याचा मुकुट, हार आणि धनुष्य...' प्राणप्रतिष्ठावेळचा रामलल्‍लाचा मनमोहक शृंगार

पुढारी ऑनलाईन डेस्क: रामलल्‍ला अखेर आज (दि.२२) अयोध्येत विराजमान झाले. विविध धार्मिक विधींसह रामलल्‍लाच्‍या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना  रण्यात आली. या मूर्तीची खास छायाचित्रे समोर आली आहेत. मूर्तीमध्ये देवाचे संपूर्ण रूप पाहता येत आहे. समोर आलेल्या छायाचित्रात रामलला अतिशय सौम्य अन् चेहऱ्यावरील स्मित मुद्रेत दिसत आहे. चला जाणून घेऊया मूर्तीमध्ये काय आहे खास… ( Ram Mandir Inauguration)

चला जाणून घेऊया रामललाच्या मूर्तीची खास वैशिष्ट्ये…

भगवान रामाच्या बालस्वरूप स्वरूपातील मूर्तीची गर्भगृहात स्थापना केल्यानंतर आज (दि.२२) मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आला. रामलल्‍लाच्या कपाळावर तिलक लेऊन राम अतिशय सौम्य मुद्रेत दिसत आहेत. दागिने आणि वस्त्रांनी सजलेल्या रामलल्‍लाच्या चेहऱ्यावर भाविकांना मोहित करणारे हास्य दिसते. त्याने कानात कुंडल आणि पायात कडे घातले आहे.  (Ram Mandir Inauguration)

मूर्तीमध्ये भगवान विष्णूचे १० अवतार

रामलल्‍ला मूर्तीच्या चौबाजूंनी आभाळमंडळ आहे. मूर्तीवर स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्यदेव आहेत. श्रीरामाचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. सुंदर कपाळ, मोठे डोळे आणि भव्य कपाळ आहे. भगवान रामाचा उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत आहे. मूर्तीमध्ये भगवान विष्णूचे १० अवतार दिसत आहेत. मूर्तीच्या खाली एका बाजूला रामाचे निस्सीम भक्त हनुमान कोरलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला गरुड कोरलेले आहेत. (Ram Mandir Inauguration)

‘राम’मूर्तीमध्ये बालपण, देवत्व आणि राजकुमाराची प्रतिमा

प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या रामलल्‍लाच्या मूर्तीत बालसदृश कोमलता दिसत आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामाचे हे शिल्प साकारलेले आहे. याआधी, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी निवडलेल्या मूर्तीमध्ये बालपण, देवत्व आणि राजकुमाराची प्रतिमा दिसत असल्याची माहिती दिली होती.

रामललांनी पितांबर परिधान केले असून, त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण आहे.

रामललाने सोन्याचे कवचकुंडल, कंबरेला माळा धारण केली आहे.

राममूर्तीच्या डोक्यावरील रत्नजडित मुकुटाचे वजन सुमारे पाच किलो असल्याचे सांगितले जाते.

रामललाच्या मुकुटाला नऊ रत्ने शोभत आहेत. त्यांच्या गळ्यात सुंदर रत्नांची माला आहे.

प्रभू रामललाचा कमरपट्टाही सोन्याचा आहे.

रामललाच्या दागिन्यांमध्ये रत्न, मोती आणि हिरे यांचा समावेश आहे.

रामललाच्या चरणी वज्र, ध्वज आणि अंकुश ही प्रतीके विभूषित आहेत.

कमरेवर कमरपट्टा आणि पोटावर त्रिवली आहे.

रामललाचे विशाल हात दागिन्यांनी सजलेले आहेत.

रामललाच्या छातीवर वाघाच्या पंजाची अतिशय अनोखी छटा आहे.

छाती रत्नांनी जडलेल्या मोत्याच्या हाराने सजलेली आहे.

हेही वाचा:

Back to top button