Ram Mandir ceremony : व्हिएतनाम; वाल्मीक ऋषींबाबतचा शिलालेख | पुढारी

Ram Mandir ceremony : व्हिएतनाम; वाल्मीक ऋषींबाबतचा शिलालेख

अमेरिकन लष्कराला पळताभुई थोडी करणार्‍या व्हिएतनाममधील शूर लोकही रामावतार आपल्याच देशात झाल्याचे मानतात.

सातव्या शतकातील एक शिलालेख व्हिएतनाममध्ये आढळून आलेला आहे. त्यात महर्षी वाल्मीकींच्या मंदिराचा उल्लेखही आहे. या मंदिराचे पुनर्निमाण प्रकाश धर्म (इ. स. 653-679) नावाच्या सम्राटाने केले होते.

व्हिएतनाममधील हा शिलालेख आगळा यासाठी, की, वाल्मीकींच्या भारत या खर्‍याखुर्‍या जन्मभूमीतही त्यांच्या कुठल्याही प्राचीन मंदिराच्या खाणखुणा उपलब्ध नाहीत.

Back to top button