पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५ लाख ६९ हजाराचा मुद्देमाल जप्त | पुढारी

पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५ लाख ६९ हजाराचा मुद्देमाल जप्त

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरातील गोल्डन सिटीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा घातला. या कार वाईत शहरासह ग्रामीण भागातील दहा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले, तर त्यांच्याकडून ५लाख ६९ हजार २३१ रुपयांच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. असण्याची धडक कारवाई संगमनेर शहर पोलीस पथकाने केली संगमनेर शहर पोलिसांची माहिती अशी की काल शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोल्डनसिटीतील बुवासाहेब नवले नगर भागात असलेल्या काटवनामध्ये तिरट नावाचा हर जीतीचा खेळ सुरू असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांना खबर्यामार्फत समजली. त्यानुसार पो. नि ढुमणे यांनी संगमनेर शहर पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव,महिला पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल, सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे, पो कॉ रोहिदास शिरसाट,विवेक जाधव व विशाल कर्पे, महिला पो. कॉ स्वाती ठोंबरे यांनी फौजफाट्यासह गोल्डन सिटीतील जुगार अड्ड्यावरती छापा टाकला.

या कारवाईमध्ये पोलिसांनी दिपक किसन अरगडे (वय ४२, रा. सिद्धिविनायक सुपर मार्केटच्या मागे, मालदाड रोड) याच्या ताब्यातून २० हजार २८६ रुपयांचा, मुद्दे माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्या नंतर भगवान खंडू राहणे (वय ५६ वर्ष,रा. लक्ष्मीनगर) याच्या ताब्यातून १०हजार १०० रुपयांचा, मंगेश लक्ष्मण सातपुते (वय ४१रा. पावबाकी रोड) याच्या ताब्या तून १२ हजार १८० रुपयांचा, जितेंद्र संभाजी दवे (वय ४९,रा.साईनगर) याच्या ताब्यातून २हजार २०० रुपयांचा, प्रवीण उर्फ भाऊ बाळूसिंग चव्हाण (वय 50, या. चवृहाणपूरा)याच्या ताब्यातून ५हजार ३३५ रुपयांचा.

बाळासाहेब शिवराम अरगडे (वय ४३, रा. राहाणे आखाडा, गुंजाळवाडी) याच्या ताब्यातून ३० हजार २८० रुपयांचा, चेतन दिलीप ठाकूर (वय २८रा.पार्श्वनाथ गल्ली) याच्या ताब्यातून १२हजार १७० रुपयांचा, शैलेश त्रिंबक राव देशमुख (वय ४६, रा. वकील मळा, धांदरफळ बू. याच्या ताब्या तून १५ हजार २७० रुपयांचा, हरीश दिलीप देशमुख (वय ४१, रा. जवळे कडलग) याच्या ताब्यातून १५हजार २३० रुपयांचा,शेटीबा दामू पवार (वय ५२, रा. रामनगर झोपड पट्टी) याच्याकडून ९ हजार १८० रुपयांचा असा एकूण ५ लाख ६९ हजार २३१ रुपयांचा मुद्देमाल व तिरट नावाचा जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे .याप्रकरणी पो कॉ विशाल कर्पे यांनी संगमनेर शहरपोलीसात दिलेल्या फिर्यादी वरून वरील दहा जुगाऱ्यांवर मुंबई जुगार कायद्याचे कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल वकरण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे करत आहे.

हेही वाचा

Back to top button