मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप घाबरले : नाना पटोले | पुढारी

मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप घाबरले : नाना पटोले

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा आजपासून सुरु होणा-या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ईडी, सीबीआय, यासारख्या केंद्रीय संस्थांची भीती दाखवून आमच्या काही सहका-यांना आपल्यासोबत घेत असल्‍याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.

काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेत आहेत. भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे, पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून, यात्रेच्या समाप्ती सोबतच असंवैधानिक भाजप, शिंदे, अजित पवार सरकारचाही शेवट होणार असल्‍याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button