भोरचा पाणीपुरवठा होणार सुरळीत; पाण्याच्या टाकीचे लोकार्पण | पुढारी

भोरचा पाणीपुरवठा होणार सुरळीत; पाण्याच्या टाकीचे लोकार्पण

भोर : पुढारी वृत्तसेवा: भोर नगरपरिषदेच्या राज्य शासन वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शहरातील नागरिकांसाठी 20 लाख लिटर पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येणार्‍या काळात शहराचा अधिकचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केली. पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून त्या कामाचे गुरुवारी (दि. 11) आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शहरातील शंकर हिल येथे भोर नगरपरिषदेच्या माध्यमातून 72 लाख 75 हजार निधीतून उभारण्यात आलेल्या 20 लाख लिटर पाण्याची टाकीचे बांधकाम पूर्ण झाले.

तसेच भोर शहरातील कचरा संकलन करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 4 घंटागाडींचे आ. संग्राम थोपटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी भोर नगरपरिषदेचे गटनेते सचिन हर्णसकर, उपनगराध्यक्ष समीर सागळे, गणेश पवार, नगरसेवक चंद्रकांत मळेकर, सुमंत शेटे, परवेश शेख, चंद्रकांत सागळे, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नगरअभियंता अभिजित सोनावले, दिलीप भारंबे, महिंद्र बांदल, समीर आत्तार, राजेंद्र जराड, विशाल भालेराव, चिंतामणी कन्सट्रक्शनचे मालक बाळासाहेब ठाकर, नवनाथ गाडे, अजिंक्य साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button