North Korea | उ. कोरिया हुकूमशहा ‘किम जोंग उन’ची सटकली; द. कोरियावर डागले २०० तोफगोळे | पुढारी

North Korea | उ. कोरिया हुकूमशहा 'किम जोंग उन'ची सटकली; द. कोरियावर डागले २०० तोफगोळे

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने दक्षिण कोरियाला लक्ष्य केले आहे. किम जोंग उन याच्या आदेशाने उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर २०० हून अधिक तोफगोळे डागले आहेत. या हल्ल्यामुळे दक्षिण कोरियाच्या दोन बेटांवरील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (North Korea fires)

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर केलेल्या हल्ल्यामुळे मात्र कोणतेही नुकसान झालेले नाही, असे दक्षिण कोरियाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, दोन्ही कोरियांमधील सागरी सीमा नॉर्थन लिमिट लाइनच्या (NLL) उत्तरेला हे तोफगोळे पडल्याचेही दक्षिण कोरियाने स्पष्ट केले आहे. (North Korea fires)

North Korea fires: द. कोरिया बेटावरील २ हजार लोकांना स्थलांतराचे आदेश

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर २०० हून अधिक तोफगोळे डागले आहेत. हे तोफगोळे दक्षिण कोरियाच्या हद्दीत पडले नसले तरी अजूनही या भागात तणावाचे वातावरण आहे. दक्षिण कोरियाच्या लष्कराने या हल्ल्याची माहिती दिली आहे. लष्कराने सांगितले की, उत्तर कोरियाने दक्षिणेकडील येओनप्योंग बेटावर २०० हून अधिक तोफगोळे डागले आहेत. यानंतर लगेचच दक्षिण कोरियाने बेटावर राहणाऱ्या २ हजार लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला. दक्षिण कोरियाने या कारवाईचा निषेध केला असून याला ‘प्रक्षोभक कृती’ म्हटले आहे. (North Korea fires)

यापूर्वीच्या हल्ल्यात द. कोरियातील ४ जणांचा मृत्यू

अलीकडेच दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये तणाव कमी करण्यासाठी करार झाले होते, मात्र या घटनेनंतर हा करार संपुष्टात आला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या सीमेला लागून असलेल्या समुद्रात बॉम्बफेक केली होती. २०१० मध्ये देखील किम जोंग उनने येओनप्योंग बेटावर हल्ला केला होता ज्यात ४ लोक मारले गेले होते.

हेही वाचा:

Back to top button