‘डिवचले तर अमेरिका आणि दक्षिण कोरियाला संपवून टाका’; किम जोंग उन यांचे सैन्याला आदेश | पुढारी

'डिवचले तर अमेरिका आणि दक्षिण कोरियाला संपवून टाका'; किम जोंग उन यांचे सैन्याला आदेश

पुढारी ऑनलाईन ; उत्‍तर कोरियाचा तानाशाहा किम जोंग उनने अमेरिका आणि शेजारी देश दक्षिण कोरियावर आपला राग व्यक्‍त केला आहे. सतत लष्करी गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करणाऱ्या उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने आपल्या सैन्याला सज्ज राहण्यास सांगितले आहे. किम जोंगने आपल्‍या सैन्याला आदेश दिला आहे की, अमेरिका आणि दक्षिण कोरियाने उकसवण्याचा प्रयत्‍न केला तर त्‍यांचे नामोनिशान मिटवून टाका. उत्‍तर कोरियाच्या सरकारी माध्यमाने सोमवारी या विषयी माहिती दिली आहे.

जास्‍तीत-जास्‍त परमाणू शस्‍त्रांची निर्मिती करणार : किम जोंग उन

२०२४ च्या नोव्हेंबर महिण्यात अमेरिकेच्या राष्‍ट्रपती पदासाठीची निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. त्‍या पार्श्वभूमीवर असं मानण्यात येत आहे की, उत्‍तर कोरियाकडून या वर्षी अधिक शस्‍त्रांच परीक्षण करण्यात येउ शकतं. गेल्‍या आठवड्यात सत्‍तारूढ दलाच्या पाच दिवसांच्या बैठकीत किम जोंग ने म्‍हटले की, या वर्षी आणखी तीन गुप्तचर उपग्रहांचे प्रक्षेपण करणार, अधिक परमाणू शस्‍त्रांची निर्मिती करणार आणि हल्‍ला करणारे ड्रोनही तयार करणार. भविष्‍यात अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी उत्‍तर कोरियाकडून शस्‍त्रांची निर्मिती आणि परीक्षण केले जात असल्‍याचे बोलले जात आहे.

किम जोंग उन यांनी रविवारी सैन्याच्या कमांडिंग अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. राष्‍ट्रीय सुरक्षेसाठी परमाणू शस्‍त्रे आणि बॉम्‍ब तयार ठेवणे गरजेचे आहे. किम जोंग यांनी या गाेष्‍टीवर जोर देताना म्‍हटलंय की, अमेरिका किंवा उत्‍तर कोरियाने उकसवले तर आपल्‍या सैन्याने न डगमगता आपली सर्व साधनसामग्री एकत्र करून त्‍यांना मिटवण्यासाठी प्रतिहल्‍ला करणे गजरेचे आहे.

हेही वाचा : 

Back to top button