Ole Aale Movie : ‘ओले आले’ मध्ये रंगून गेले नाना पाटेकर | पुढारी

Ole Aale Movie : 'ओले आले' मध्ये रंगून गेले नाना पाटेकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘ओले आले’ या चित्रपटातून नाना पाटेकरांचे आणखी काही कलारंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. (Ole Aale Movie) नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘ओले आले’ हा चित्रपट नाना पाटेकरांच्या फॅन्ससाठी एक सरप्राईज पॅकेज असणार आहे हे नक्की. (Ole Aale Movie)

संबंधित बातम्या –

मुलाच्या मागे-मागे फिरणारे…खोड्या काढणारे…जीवापाड प्रेम करणारे…आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारे नाना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत. शिस्तप्रिय बाबांच्या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट अशी ही नानांची भूमिका आपल्याला पोट धरून हसायला लावतेय.

आजवर नानांच्या विविध भूमिका आपण पाहिल्या आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका आपल्याला काही ना काही तरी देऊनच जाते. अशीच ‘ओले आले’ चित्रपटातील नानांची भूमिका ”जगणं समृद्ध करायला शिकवणारी आहे” असं ते सांगतात.

चला जगूया, हसूया, फिरूया म्हणणारे नाना पाटेकर कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘ओले आले’ या चित्रपटाद्वारे येत्या ५ जानेवारीपासून चित्रपटगृहात भेटणार आहेत. या चित्रपटात नाना पाटेकरांसोबतच मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव यांच्या ही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.

Back to top button