पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आगामी 'फायटर' ( Fighter Movie ) हा चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजे, २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटात हृतिकसोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांनीही मुख्य भूमिका साकारल्यात. नुकतेच या चित्रपटाची 'शेर खुल गए' आणि 'इश्क जैसा कुछ' ही दोन्ही गाणी रिलीज झाली आहेत. ही गाणी बॉस्को मार्टिसने कोरिओग्राफर केली आहेत. दरम्यान गाण्याचे हृतिकने भरभरून कौतुक करत कोरिओग्राफरला याबद्दलचे श्रेय देण्याचे मोठे काम केलं आहे.
संबंधित बातम्या
कोरिओग्राफर बॉस्को मार्टिसने गेल्या काही दिवसांत इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत 'फायटर' ( Fighter Movie ) च्या गाण्यामध्ये कोरिओग्राफरला श्रेय न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं होतं की, चित्रपटामधील साईटचे कलाकार आणि कोरिओग्राफर यांना वगळता सर्वांनाच श्रेय मिळत असते. संपूर्ण देशाला या गाण्यावर नाचवले तो मागे पडला. असे त्याने म्हटलं होतं. आता या पोस्टची दखल घेवून हृतिकने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याच्यांशी चर्चा केली. आणि शेवटी कोरिओग्राफरला त्याच्या गाण्याचे श्रेय मिळवून दिले.
दरम्यान एका रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, एका कोरिओग्राफरला त्याचे हक्क मिळत नसल्यामुळे हृतिकला समाधान वाटले नाही. यामुळे त्याने पुढाकार घेवून संपूर्ण क्रेडिट लिस्ट गाण्याच्या यूट्यूब आवृत्तीमध्ये ती जोडली गेल्याचे सांगितले. यामध्ये कोरिओग्राफर बॉस्कोसोबत नृत्यदिग्दर्शक – बॉस्को-सीझर, रेमो डिसूझा आणि पियुष-शाझिया यांच्या नावांचा समावेश झाला आहे. दरम्यान हृतिकने त्यांच्या टीमला आगामी प्रोजेक्टमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.
'फायटर' हा चित्रपट ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने म्हणजे, २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. हृतिक आणि दीपिकासोबत चित्रपटात करण सिंह ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख, महेश शेट्टी आणि तलत अजीज हे कलाकार दिसणार आहेत. यामुळे पडद्यावर हृतिक आणि दीपिकाला पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.