भुसावळ तालुक्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा रूग्ण; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर | पुढारी

भुसावळ तालुक्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा रूग्ण; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. भुसावळ तालुक्यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरियंट हा देशाच्या कानाकोपर्‍यात वेगाने पसरत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ठिकठिकाणी चाचण्यांना वेग आलेला आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजे २० टक्के कोवीड तपासण्या जळगाव जिल्ह्यात झाल्या आहेत. आज (दि. २५) भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे या गावातील ४३ वर्षाचा रूग्ण हा कोरोनाने बाधीत असल्याचे चाचण्यांमधून निष्पन्न झाले. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. हा रुग्ण बाहेरील देशातून प्रवास करुन आल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीनुसार सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या काळात तो नेपाळ येथे आसल्याची माहिती देण्यात आली आहे. या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व १४ जणांची कोवीड तपासणी निगेटिव्ह आली आहे.

संबंधीत रुग्णाची प्रकृती ही धोक्याबाहेर असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोरोनाचा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत असला तरी तो आधी इतका धोकादायक नसल्याची माहिती तज्ज्ञांनी आधीच दिलेली आहे. तथापि, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Back to top button