बीड : परळी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

file photo
file photo

परळी, पुढारी वृत्तसेवा : परळी येथील चेंबरी रेस्ट हाऊस नजीक रात्री आठच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. बरकतनगर येथील रहिवासी असलेले सय्यद अब्दुल जफ्फार (वय.६०) आणि अजय जमुना चौधरी (वय.४५) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद आणि अजय हे आपल्या मोटारसायकलवरून परळीकडे येत असताना औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात असलेल्या उड्डाणपुलाजवळ आले. तेव्हा अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत हे दोघेही वाहनाच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परळी उपजिल्हा रूग्णालयाची रुग्णवाहिका आणि डॉ.अमोल चाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांना परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news