तुम्‍हाला मेंदू तल्‍लख करायचा आहे? ‘हा’ ठरेल उपयुक्‍त आहार | पुढारी

तुम्‍हाला मेंदू तल्‍लख करायचा आहे? 'हा' ठरेल उपयुक्‍त आहार

मेंदू, हृदय, किडनी, यकृत आणि फुफ्फुसे या पाच अवयवांचे आपल्या शरीर यंत्रणेत अतिशय महत्त्व असते. यापैकी एकाचे काम जरी थांबले तरी मृत्यू ओढवतो. मानवी मेंदू ही तर निसर्गाची अतिशय महत्त्वाची व थक्क करणारी निर्मिती आहे. मेंदूमुळेच माणूस प्रगत झालेला आहे. या मेंदूच्या आरोग्यासाठी विशिष्ट आहार उपयुक्त ठरत असतो. त्याबाबतची तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती…

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड : मेंदूच्या आरोग्यासाठी ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचा स्रोत असलेल्या आहाराचा समावेश करणे आवश्यक आहे; ज्यामध्ये फॅटी फिश (सॅल्मन, ट्राउट), फ्लेक्स सीड्स, चिया सीड्स व अक्रोड यांचा समावेश आहे. ओमेगा-3 मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण असून, ते संज्ञानात्मक फायद्यांशी संबंधित आहेत.

अँटिऑक्सिडंट-समृद्ध अन्न : अँटिऑक्सिडंट्सने भरपूर फळे आणि भाज्यांचा; ज्यामध्ये बेरी, पालेभाज्या व रंगीबेरंगी भाज्यांचा समावेश करा. अँटिऑक्सिडंट्स मेंदूचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतो; जे संज्ञानात्मक घट होण्याशी संबंधित आहे. अँटिऑक्सिडंट्स म्हणजे न्निातील नैसर्गिक पदार्थ; जे आपल्याला काही आजारांपासून वाचवितात.

संपूर्ण धान्य : तपकिरी तांदूळ, क्विनोआ व ओट्ससारखे संपूर्ण धान्य; जे मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा करतात. त्याशिवाय ते फायबरचा चांगला स्रोत असतात. संपूर्ण धान्य हे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्याला सक्रिय ठेवण्यास मदत करतात.

फॅटी फिश (सॅल्मन) : हा मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचा प्रमुख स्रोत आहे. ओमेगा-3 मेंदूच्या संरचनेला आणि कार्यास मदत करतो, तसेच संज्ञानात्मक कार्याला प्रोत्साहन देतो.

ब्ल्यूबेरी : अँटिऑक्सिडंट्स, विशेषत: फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध, ब्ल्यूबेरी चांगल्या स्मृती व संज्ञानात्मक कार्यक्षमतेशी संबंधित आहेत. ते ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.

प्रथिने : अंडी, टोफू व शेंगा यासारख्या लीन प्रथिनांचा आहारात समावेश करा. प्रथिने अमिनो अ‍ॅसिड पुरवतात.

ब्रोकोली : अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन केने समृद्ध ब्रोकोली मेंदूच्या निरोगी कार्याला मदत करते. त्यामध्ये संज्ञानात्मक कार्यक्षमतेशी जोडलेली संयुगेदेखील आहेत.

हळद : हळदीत कर्क्युमिन नावाचे सक्रिय संयुग असते. त्यामध्ये दाहकविरोधी आणि अँटिऑक्सिडंट्सचे फायदे आहेत; जे मेंदूच्या आरोग्याला फायदेशीर आहेत.

नट आणि बिया : अक्रोड, बदाम व फ्लेक्स सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडस्, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ईने समृद्ध असतात. हे पोषक घटक मेंदूच्या संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देतात आणि वयाशी संबंधित संज्ञानात्मक घट होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.

Back to top button