Karni Sena chief murder: करणी सेना प्रमुख हत्या प्रकरण: २ शूटर्ससह, त्यांचा साथीदार अटकेत | पुढारी

Karni Sena chief murder: करणी सेना प्रमुख हत्या प्रकरण: २ शूटर्ससह, त्यांचा साथीदार अटकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी दोन शूटर आणि त्यांच्या एका साथीदारासह तिघांना चंदीगडमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली गुन्हे शाखा आणि राजस्थान पोलिसांनी काल (दि.९) रात्री उशिरा संयुक्त कारवाई करत संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. (Karni Sena chief murder)

दिल्ली पोलिसांनी रोहित आणि उधमला दिल्लीत आणले, तर नितीन फौजी राजस्थान पोलिसांच्या ताब्यात आहे. याआधी पोलिसांनी त्यांच्या अटकेची माहिती देणाऱ्याला ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर आरोपींनी शस्त्रे लपवून ठेवली आणि राजस्थानमधून हरियाणातील हिसार येथे पोहोचले. त्यानंतर ते हिमाचल प्रदेशातील मनाली येथे गेले. नंतर ते चंदीगडला परतले, जिथे या तिघांना अटक करण्यात आली, असे देखील वृत्तात म्हटले आहे. (Karni Sena chief murder)

 Karni Sena president : हत्‍येसाठी घेतली एसयूव्ही कार भाड्याने

मकराना नागौर येथील रोहित राठौर आणि हरियाणातील महेंद्रगडचा नितीन फौजी अशी संशयित आरोपींची नावे आहेत. नवीन शेखावत, रोहित राठोड आणि नितीन फौजी यांनी देणगी देण्याच्या बहाण्याने करणी सेनेच्या प्रमुखाची भेट घेतली होती. हत्येसाठी नवीनने तीन दिवसांपूर्वी मालवीय नगर येथील एजन्सीकडून प्रतिदिन ५ हजार रुपये भाड्याने एक एसयूव्ही कार घेतली. आरोपी गोगामेडी यांच्या निवासस्थानी कार सोडून गेले होते. कारमधून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button