Karni Sena president : करणी सेना अध्‍यक्षांची हत्‍या जमिनीच्‍या वादातून : पोलिसांचा संशय

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी. ( संग्रहित छायाचित्र )
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी. ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष (Karni Sena president) सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवार, ५ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्‍यात आली, दरम्‍यान, सुखदेव सिंह यांच्या हत्येतील दोन आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी, असा संशय राजस्‍थान पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

Karni Sena president : हत्‍येसाठी घेतली एसयूव्ही कार भाड्याने

मकराना नागौर येथील रोहित राठौर आणि हरियाणातील महेंद्रगडचा नितीन फौजी अशी संशयित आरोपींची नावे आहेत. नवीन शेखावत, रोहित राठोड आणि नितीन फौजी यांनी देणगी देण्याच्या बहाण्याने करणी सेनेच्या प्रमुखाची भेट घेतली होती. हत्येसाठी नवीनने तीन दिवसांपूर्वी मालवीय नगर येथील एजन्सीकडून प्रतिदिन ५ हजार रुपये भाड्याने एक एसयूव्ही कार घेतली. आरोपी गोगामेडी यांच्या निवासस्थानी कार सोडून गेले होते. कारमधून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Karni Sena president )

गँगस्टर रोहित गोदारा याने या हत्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर तशी पोस्टही त्याने शेअर केली. रोहित गोदारा हा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित आहे. करणी सेनेचे अध्‍यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी आणि रोहित गोदारा याचच्या जमिनीवरुन वाद होता, अशी माहिती प्राथमिक पोलीस तपासात समोर आली आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा अन्य बाजूंनीही तपास करत आहेत. विजेंद्र सिंह या मालमत्ता खरेदी-विक्री करणार्‍या एजंटची गेल्या वर्षी हत्या झाली होती. या हत्‍या प्रकरणातील आरोपी हे करणी सेने अध्‍यक्ष सुखदेव सिंह यांचे निकटवर्ती होते. या हत्येचा बदला घेण्‍यासाठी सुखदेव यांची हत्‍या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त होत आहे.

 आज 'राजस्थान बंद'ची हाक

सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येच्‍या निषेधार्थ श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना आणि इतर समुदाय संघटनांनी राजस्थानमध्ये आज (दि.६) बंदची हाक दिली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.( Karni Sena chief murder case )

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news