चंद्रपूर: चिमुरात तिसऱ्या दिवशी थाळी वाजवून आंदोलन | पुढारी

चंद्रपूर: चिमुरात तिसऱ्या दिवशी थाळी वाजवून आंदोलन

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरच्या वतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी 7 डिसेंबर पासून सुरू झालेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी थाळी वाजवून आंदोलन करण्यात आले. तर काही ओबिसी बांधवांनी साखळी उपोषण सूरु केले आहे. अन्नत्याग आंदोलनाला पक्ष व विविध संघटनांनी पाठींबा दिला आहे.

चिमूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखेच्या वतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी 7 डिसेंबर पासून अन्नत्याग आंदोलन अजित सूकारे व अक्षय लांजेवार यांनी सुरू केले. त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला यांच्या पाठिंबा दर्शवून देत आज तिसऱ्या दिवशी शनिवारी श्रीहरी सातपुते. अविनाश अगडे. पप्पू शेख. अमोल जूनघरे यांनी साखळी उपोषण सुरू केले. अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवशी तहसील कार्यालय समोर पाठिंबा देवून थाळी वाजवून आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी यामिनी कामडी. दुर्गा निवटे. विजया तरारे. सुनीता सहारे. कपिला चावरे. सुनीता मुरकुठे. रेखा चाचारकर. मंदा रंधये पुज्या नन्नावरे. शेकडो ओबीसी महिला पुरुष व विवीध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा 

Back to top button