चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव परिसरात आठवडाभरापासून एका बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. आज (दि.८) अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. आज पहाटे वनविभागाने सापळा रचून या बिबट्याला पकडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मागील आठवड्याभरापासून गावात धुमाकूळ घालत बिबट्याने पाळीव जनावरांना भक्ष करण्याचा सपाटा लावला होता. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. शेतकऱ्यांनी बिबट्याच्या भीतीपोटी शेतात जाणे बंद केले होते. वनविभागाने घटनेची गंभीरता लक्षात घेत परिसरात रात्रीची गस्त वाढवली. व बिबट्याचा ज्या परिसरात वावर आहे, त्या मार्गावर ट्रॅप कॅमेरा लावला. आज पहाटे सापळ्या रचून या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गावालगत वेजगाव जंगल असल्यामुळे परिसरातील नागरिकांना वनप्राण्यांचा कायम धोका आहे.
हेही वाचा :