Gaza War : गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत फेटाळला | पुढारी

Gaza War : गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत फेटाळला

पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात दोन महिन्यांहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. गेल्या २४ तासांत गाझामध्ये इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात ३०० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आणलेला ठराव फोल ठरला आहे. अमेरिकेच्या व्हेटोमुळे (vetoes) हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.

यूएनने मांडलेल्या मसुद्याच्या ठरावात गाझामध्ये तात्काळ युद्धविराम आणि सर्व ओलीसांची बिनशर्त तात्काळ सुटका करण्याची मागणी करण्यात आली होती. १३ सदस्य देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. अमेरिकेने मात्र ठरावावर व्हेटो केला, तर यूकेने मतदानापासून दूर राहिले.

यूएनमधील अमेरिकेचे दूत रॉबर्ट वुड यांनी युद्धविराम प्रस्ताव वास्तवाच्या पलीकडे असल्याचे सांगितले. प्रस्तावाला व्हेटो केल्यानंतर, वुड म्हणाले की मसुदा तयार करण्याची आणि प्रस्तावावर मतदान करण्याची प्रक्रिया घाईत झाली. योग्य सल्लामसलत झाली नाही. आमच्या सर्व शिफारशींकडे दुर्लक्ष करण्यात आले. अमेरिका गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याच्या आवाहनाला समर्थन देत नाही, कारण यामुळे पुढील युद्धाची बीजे पेरली जातील. हमासचा इस्रायलसाठी धोका कायम आहे. काही सदस्य राष्ट्रांनी आवाहन केल्याप्रमाणे आज इस्रायलने एकतर्फी शस्त्रे समर्पण केली तर हमास ओलीस ठेवलेल्यांना सोडणार नाही. कोणतेही सरकार आपल्या सीमेवर धोका पत्करणार नसल्याचे वुड म्हणाले. आम्ही तात्काळ युद्धबंदीच्या आवाहनाला पाठिंबा देत नाही. यामुळे पुढील युद्धाची बीजे पेरली जातील, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button