Steve Jobs Sign Cheque : ३३३ रुपयांच्या चेकचा लाखो रुपयांना लिलाव; काय आहे खास?

Steve Jobs Sign Cheque : ३३३ रुपयांच्या चेकचा लाखो रुपयांना लिलाव; काय आहे खास?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अॅपलच्या (Apple) जुन्या उत्पादनांचा अनेक वेळा लिलाव होतो. कधी पॅकबंद आयफोनचा लिलाव होतो, तर कधी मॅकचा; पण यावेळी अॅपल (Apple) चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची सही असलेल्या चेकचा (Steve Jobs Sign Cheque) लिलाव करण्यात आला. ४.०१ डॉलर्स (३३३ रुपये) च्या या चेकला ९० लाख रुपये किंमत आली आहे.

अॅपल (Apple) चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते क्वचितच कोणाला ऑटोग्राफ देत होते. त्यामुळेच आज त्यांच्या सहीची किंमत लाखो रुपये आहे. नुकताच त्यांनी सही केलेल्या चेकचा लिलाव होत आहे. हा चेक $१०६,९८५ (अंदाजे ८९,१८,६२८ रु) मध्ये लिलाव झाला आहे. लिलावात २५ हजार डॉलर्सपर्यंत किंमत येण्याची शक्यता होती. ज्याची भारतीय रुपयात किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. (Steve Jobs Sign Cheque)

हा (Steve Jobs Sign Cheque) चेक २३ जुलै १९७६ चा आहे, जो अॅपल (Apple) कॉम्प्युटर कंपनीने जारी केला आहे. त्यावर स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची सही आहे. या चेकचा अमेरिकेतील आरआर ऑक्शन फर्मद्वारे लिलाव केला जात आहे. हा चेक ४.०१ डॉलर्स  (अंदाजे ३३३ रु.)चा आहे.

कधी केली होती सही? (Steve Jobs Sign Cheque)

ऑक्शन हाऊसनुसार, जॉब्स आणि अॅपल (Apple) चे सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नियाक अॅपल-१ वर काम करत असताना या चेकवर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यावेळी केवळ ५० संगणक तयार केले होते. हे संगणक कॅलिफोर्नियाच्या बाइट शॉपला विकले गेले. अॅपल १ हे पर्सनल कॉम्प्युटरच्या जगात खूप महत्वाचे मानले जाते. येथूनच अॅपलच्या प्रवासाला वेगळे वळण लागले. या (Steve Jobs Sign Cheque) चेकबद्दल, लिलाव करणार्‍या फर्मने म्हटले आहे की, तो अॅपल कॉम्प्युटर कंपनी (Apple Computer Company)ने जारी केला आहे.

तीन महिन्यांपूर्वीच सुरू झाले होते Apple

तो चेक ६X३ इंचाचा आहे, ज्यामध्ये स्टीव्ह जॉब्सचे नाव लिहिले आहे. हा चेक २३ जुलै १९७६ चा आहे. हा धनादेश रेडिओ शॅक (Radio Shack) ला देण्यात आला. या चेकमधील अॅपलचा पहिला अधिकृत पत्ता '770 Welch Rd., Ste. 154, Palo Alto' आहे. या चेकवर स्वाक्षरी होण्याच्या काही दिवस आधी अॅपल (Apple Computer Company)ची स्थापना झाली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news