पाथर्डी आगाराच्या बहुतांश बस एक्सपायर  | पुढारी

पाथर्डी आगाराच्या बहुतांश बस एक्सपायर 

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी एस. टी. आगाराच्या बहुसंख्या बसेस कालभाय्या होऊन वयोवृद्ध झा÷ल्या आहेत. यामुळे अनेक गाड्या धावतानाच रस्त्यावर अचानक बंद पडण्याचे प्रमाण दैनंदिन झाले आहे. दररोज ठिकठिकाणी बंद पडून प्रवाशासह चालक-वाहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शनिवारी पाथर्डी-अहमदनगर ही बस माळीवाडा बस स्थानका बाहेर पडल्यानंतर बंद पडली.
रस्त्यात बस बंद पडल्याने बराच वेळ वाहतू कोंडी झाली होती. तर पाथर्डी- पुण्याकडे जाणारी बस सुप्याजवळ बंद पडली. चालक-वाहकांनी प्रवाशांना इतर बसमध्ये बसवून सुप्यातून बस टोचन करून पारनेर डेपोत आणली. या दोन्ही लांब पल्याच्या गाड्या नादुरुस्त झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.  तर, चालक-वाहकांना विनाकारण प्रवाशांच्या रोशाला सामोरे जावे लागले. पाथर्डी आगाराच्या बस दररोज कुठे ना कुठे बंद पडलेल्या पाहायला मिळतात. रस्त्यावर बंद पडलेली बस व प्रवासी इतर गाड्यांना हात करताहेत हे चित्र नेहमीचे आहे. लांब पल्ल्याच्या बस वेळोवेळी बंद पडू लागल्याने एसटीची प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
पाथर्डी आगारात एकूण 57 बस आहेत. त्यातील 60 टक्केपेक्षा अधिक बसची लाईफ संपलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवीन बस मिळाल्या नसल्याने या वयोवृ÷द्ध बस रस्त्यावर धावत आहेत. त्यात दुरुस्तीसाठी सुटे भाग मिळत नाहीत. प्रवाशांचा रोष येऊ नये म्हणून थातूर-मातूर दुरुस्ती करून गाड्या सोडाव्या लागतात. शाळेच्या सहली व लग्न समारंभाप्रासंगिक करारासाठी काही बर्‍या आवस्थेतील बस पाठविल्या की वयोवृद्ध बस लांब  पल्ल्यावर पाठविल्या जातात.
आशा, परिस्थितीमुळे पाथर्डी बस आगार फक्त कागदावर चालला आहे. प्रत्यक्षात ठिकठिकाणी बसेस बंद पडलेल्या दिसतात. काही दिवसापूर्वी पाथर्डी आगाराला दोन बस नवीन बस मिळाल्या होत्या; परंतु तालुक्यातील राजकीय ताकद कमी पडल्याने त्या इतर तालुक्यात गेल्या. वरिष्ठासह स्थानिक अधिकार्‍यांची उदासीनता, अहमदनगर विभागातील  अधिकार्‍यातील राजकारण, अनुभव नसलेले नवीन अधिकारी, कमी पडणारी राजकीय ताकद, मनोधैर्य खचलेले कर्मचारी, अशा अनेक कारणामुळे पाथर्डी आगाराची दयनीय अवस्था झाली आहे.

व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

पाथर्डी आगाराच्या गाड्या वेळेवर सुटत नाहीत, असा आरोप शहर व्यापारी संघटनेने केला. आगाराला नवीन 30 गाड्या मागून घ्याव्यात वेळापत्रकात सुधारणा करावी, उपाययोजना कराव्यात अन्यथा मंगळवारी (दि.5) आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे दिले. निवेदनावर बाळासाहेब जिरेसाळ, अमोल गर्जे, मधुकर मानूरकर, पांडुरंग शिळवणे, संतोष भागवत, भास्कर कराड, संजय दराडे, सुनील शहाणे, मोदक शहाणे, सुनील भांगे, बाळासाहेब जोजारे, वैभव चिंतामणी, अशोक नांदेवणीकर, राजेंद्र चिंतामणी, राम भंडारी आदींच्या सह्या आहेत.
पाथर्डी-पुणे गाडी सुप्याजवळ एअर लॉक झाली. वरिष्ठ फोन  करू नका म्हणतात. माणुसकी म्हणून प्रवाशांचे हाल पाहवत नाहीत. खासगी फिटरकडून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला; मात्र यशस्वी झाला नाही. प्रवाशांचा वेळ व पैसा वाया गेल्याने त्यांनी आम्हाला लाखोळी वाहिली. निमुटपणे रोशाला सामोरे जात प्रवाशांना वेगवेगळ्या गाड्या बसून दिले. एक तासाने पार्टी आली. बस टोचन करून पारनेर आगारात बस लावली. मनमानी कारभाराला कर्मचारी कंटाळे आहेत.
-गणेश चेमटे, बस चालक, पाथर्डी आगार 
हेही वाचा

Back to top button