सर्वात मोठी पनौती कोण? : भाजप नेते सीटी रवी यांनी उडवली राहुल गांधींची खिल्‍ली | पुढारी

सर्वात मोठी पनौती कोण? : भाजप नेते सीटी रवी यांनी उडवली राहुल गांधींची खिल्‍ली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ‘सर्वात मोठी पनौती (Panauti) कोण आहे?’, असे ट्विट करत भाजप नेते सीटी रवी (CT Ravi) यांनी आज (दि.३) काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi)  खिल्‍ली उडवली आहे.  चार राज्‍यांतील विधानसभा निवडणुकीचे निकालाचे चित्र स्‍पष्‍ट होत आहे. दुपारी बारापर्यंतच्‍या मतमोजणीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्‍यांमध्‍ये भाजपने निर्णायक आघाडी घेतल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.

”सर्वात मोठी पनौती कोण आहे?’, सीटी रवी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले आणि त्यांच्या पोस्टमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला टॅग केले आहे.राहुल गांधी यांनी राजस्थानच्या बाडमेर येथे जाहीर सभेला बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘पनौती’ (वाईट शगुन) म्हटले होते. क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍याला पंतपधिान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहिल्‍याने भारताचा पराभव झाला, असेही त्‍यांनी म्‍हटले होते.

प्रचार सभेत नरेंद्र मोदी यांचा उल्‍लेखा पनौती, पिकपॉकेट आणि कर्जमाफीच्या टीकेबद्दल निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती.

हेही वाचा : 

 

Back to top button